• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, November 8, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

माणगंगा by माणगंगा
September 9, 2026
in Uncategorized
0

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

दहिवडी प्रतिनिधी (प्रतिनिधी):

ग्रामीण भागामध्ये तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणाऱ्या आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आशा स्वयंसेविकांना उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण मिळावे म्हणून रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन क्रिटी केअर हॉस्पिटल, वडूज आणि इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सनकोटचे वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.ग्रामीण भागात ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन गरोदर माता, लहान मुले आणि वृद्ध रुग्णांची काळजी घेतात. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत दुपारच्या वेळी क्षेत्रिय काम करताना त्यांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागतो. हीच गरज ओळखून आशा स्वयंसेविकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वडूज येथील वडूज क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला दोन्ही संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक आरोग्य अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.यावेळी बोलताना संयोजकांनी सांगितले की, “आशा स्वयंसेविका या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा मुख्य कणा आहेत. समाजासाठी त्या देत असलेल्या योगदानाचा आदर राखत, त्यांच्या आरोग्याची सुरक्षा करणे हे आपले कर्तव्य आहे.

असे मत डॉ काटकर यांनी व्यक्त केले तर विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती आणि सहकार्य कार्यक्रमास लाभले असून सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. मारुती काटकर, सुधीर शहा, वैभव शहा, कोरेगावचे डॉ. गोसावी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाबूराव गायकवाड, जगदाळे सर, सौ. वैशाली शहा यांच्या हस्ते आशाताईंना सन कोट प्रदान करण्यात आले.हा या उपक्रमास मा. अनुराधाताई देशमुख, मा. नितीन वाघमोडे साहेब, मा. छलानी तसेच इंडियन असोसिएशन ऑफ पुणेचे चेअरमन डॉ. रुणवाल, डॉ. महाजन आणि डॉ. झालटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे आशा स्वयंसेविका यांचा कामप्रती असलेल्या निष्ठेचा भावनेतून इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांच्या सहकार्याने रामकृष्ण मेडिकल फाउंडेशनने या उपक्रमाचे पाऊल उचलले आहे

.”सनकोट मिळाल्याबद्दल उपस्थित आशा स्वयंसेविकांनी आनंद व्यक्त केला असून, यामुळे क्षेत्रिय काम करताना उन्हापासून मोठे संरक्षण मिळेल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीरशहा यांनी करून आणि पोलिस अधिकारी बाबुराव गायकवाड यांनी आभार व्यक्त केले

आशा स्वयंसेविका मानधनाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देतात. उन्हातान्हात काम करताना त्यांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, या सामाजिक भावनेतून आम्ही हे सनकोट वाटप केले आहे.”डॉ मारुती काटकरचेअरमन रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन

पन्हाळा गावात फिरताना खूप त्रास व्हायचा. या सनकोटमुळे आता उन्हापासून आमचे रक्षण होईल आणि काम करणे अधिक सोपे होईल. या मदतीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.” सुधीर शहा क्रिटी केअर हॉस्पिटल वडूज

Views: 74
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
स्पष्ट आणि परखड…सर्वच आयोजनांमध्ये डीजेच्या वापरावर बंदी घालायलाच हवीज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
Uncategorized

स्पष्ट आणि परखड…सर्वच आयोजनांमध्ये डीजेच्या वापरावर बंदी घालायलाच हवीज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 5, 2026
Next Post

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)