धम्मक्रांतीच्या विचाराला गती देणारी—किल्लारीतील विशाल धम्म परिषद
——————————————
प्रासंगिक
——————————————
प्रा.राजा जगताप
उस्मानाबाद
मो.९८८११८८२६३
संघमिञा व तक्षशिला बुध्दविहार किल्लारी ता.औसा.जि.लातूर येथील पुज्य भंतेजी आदरणीय धम्मसारजी यांनी तेथील दातृत्व जपणा—या बौध्द उपासक—उपासिका व किल्लारी परिसरातील दानशूर बांधवांच्या प्रबळ इच्छाशक्तीवर…चालू नविन२०२३वर्षातील पहिलीच,लातूर—उस्मानाबाद परिसरातील दि.८जानेवारी२०२३रोजी,दुसरी विशाल धम्म परिषद आदरणीय व वंदणीय पुज्य.भदंतउपगुप्तजी महाथेरो यांचे अध्यक्षस्तेखाली व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भंतेगनासह यांचे साक्षीने आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमराव आंबेडकर यांचे उपस्थित नियोजनबध्द,नियोजन करून शांततेच्या वातावरणात घेतली त्या विशाल धम्मपरिषदेला सकाळपासून ते सायंकाळ पर्यंत किल्लारी,लातूर,बीड,उस्मानाबाद,पुणे.मुंबई,कर्नाटकातील हजारो बौध्द बांधवाणी उपस्थिती दाखवली तो प्रचंड पांढ—याशुभ्र वस्ञातील बौध्द समाज पाहून डोळ्याचे पारणे फिटले…!विशाल मंडपातील विशाल निळाईची गर्दी… तथागत बुध्दाच्या व भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव,भारतरत्न,विश्वरत्न ,बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नवलाई ऐकण्यासाठी जमली होती…आदरणीय भंतेगनांची धम्मदेसना ग्रहण करण्यासाठी हजारो मने अतूर झाली होती.धम्म परिषदेचे आयोजक असणारे भंतेजी धम्मसारजी
“धम्म परिषदेला आलेच पाहिजे!” म्हणून ते बांधवांना रोजच आवाहन करत होते.सातत्याने मोबाईलवरून बोलत होते.धम्म परिषदेचे नियोजन कसे चालले आहे माहिती देत होते.धम्म परिषदला जायचेच मी ही ठरवले होते.तेथे आपल्या “गाव तेथे बुध्द विहार “कादंबरीचा वाचकांसाठी स्टाॅल लावावा म्हणून माझा भाचा बापू गायकवाड याला सोबत घेऊन उस्मानाबाद ते किल्लारी मोटरसायकलने तेथे पोहचलो.
तेथे पोहचताच साडे तीन एकर जमिनीतील तो विशाल मंडप आणि बाहेर रस्त्यावर हजारोंच्या संख्येने असलेली वाहांनाची तोबा गर्दी! मंडपात व बाहेर पांढ—याशुभ्र वस्ञातील हजारोंच्या संख्येने जमलेले बौध्द उपासक—उपासिका,उद्याचे भवितव्य असणारी लहान मुले…धम्म विचारांची पेरणी करण्याठी,धम्मक्रांतीला गतीमान करण्यासाठी,धम्म देसना देण्यासाठी आलेले भगव्या वस्ञातील तेजोमय,आदरणीय भंतेगन!
मंडपाबाहेर लागलेले पुस्तकांचे स्टाॅल!बुध्द,बाबासाहेब यांचे विक्रीस आलेले विविध प्रकारचे फोटोंचे स्टाॅल!निळे उपरणे,फेटे,बाबासाहेबांच्या फोटोचे किचन,पुस्तके खरेदीसाठी धम्म बांधवांची उडालेली धांदल!मंडपात धम्म परिषदेच्या उदघाटनापूर्वी म्हंटली जाणारी भीमगीते…!धम्म परिषदेला येणा—यांची गर्दी…एका बाजुला केलेली भोजनाची व्यवस्था दूरवरून आलेले बांधव भोजनाचा आनंद घेत होते.सगळीकडे बुध्दाची दरवळलेली शांतता…निशभ्र आभाळ खाली सजलेला पांढराशुभ्र मंडप. नियोजित बुध्दविहाराच्या परिसरात उभारलेली बुध्दाची अकरा फुटाची उभी मुर्ती आणि तिच्या पुढे रांगेत येऊन बौध्द बांधव वंदन करण्यासाठी माते टेकवत.विशाल धम्म परिषदेच्या मंडपाच्या समोर ,दर्शनी जागेत कायमची बुध्दाची,पंचधातूची मुर्ती सर्वांना आकर्षित करत होती.त्या मुर्तीसमोरील हिरवीगार हिरवळ मनाला आनंद देत होती…आणि येणा—यांना व पुढे वंदन करणा—यांना जनु आनंद वाटत आहे अशी असे दिसत होते आणि त्याच विलोभनीय पंचधातूच्या मुर्तीच्या वरती पाषानी कलरची बुध्दाची मुर्ती व दोन दगडात कोरलेले हाती हे विलोभनीय वाटत होते. हे दातृत्ववान माणसांच्या हातून निर्माण करणं सोपं नव्हतं! हे आदरणीय भंतेजी धम्मसारजी यांचं हे येथील शाश्वत कार्य आहे.हे काम त्यांनी हजारो पिढ्यांसाठी उभारले आहे.आणि म्हणूनच भविष्यात किल्लारीतील हे ठिकान बौंध्दांसाठी पर्यटन स्थळ होणार आहे.यात तिळमाञ शंका नाही.सध्या येथील बुध्दांच्या मुर्ती चर्चेचा विषय झाला आहे.प्रत्येकजन येथे मुर्तीला वंदन केल्यावर सेल्फी घेत होता.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४आँक्टोंबर१९५६साली या देशातील दलित—वंचित पाच ते सहा लाख बांधवांना बुध्दाचा धम्म दिला!तेंव्हापासून या देशातील कोट्यावधी समाज आज शिक्षण घेऊन आज विविध क्षेञात स्थिरावला आहे व स्वाभिमानाने जीवन जगु लागला आहे.
धम्मक्रांतीला विचारानेच गतीमान करण्यासाठी या धम्म परिषदा भरवल्या जाताहेत.या धम्म परिषदातून आदरणीय भंतेगनाकडून धम्मदेसना देऊन समाजातील प्रत्येकाला बुध्दाची शुध्दता,प्रज्ञा,शील,करूणा शिकवली जात आहे.व त्याचबरोबर नितीवान,शीलवान,चारिञ्यसंपन्न,बनवले जात आहे.आष्टांगिक मार्ग धरण्यासाठी सज्ज करून स्वाभीमानी जीवन जगण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.
त्यासाठीच धम्म परिषदांना जायचे आहे.आणि त्यामुळेच धम्म परिषदांना उत्सफुर्त प्रतिसाद मिळतो आहे.आणि म्हणूनच किल्लारीची ही धम्म परिषद अनेक अंगानी यशस्वी झाली आहे असे म्हणता येईल.याचे श्रेय भंतेजी धम्मसारजी व किल्लारीकरांना द्यावेच लागेल.
या धम्म परिषदेमध्ये भारतीय बौध्द महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकरजी काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष होते.त्यांनी भाषण करताना धम्मक्रांतीच्या विचाराला गतीमान करण्याचे आवाहन केले.ते ऐकतांना जमलेल्या अनुयायात प्रचंड उत्साह होता.
——————————————
“विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या धम्मक्रांतीच्या विचारांचा रथ गतिमान करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले.”
—————————————— या धम्म परिषदेला विविध ठिकानाहून आलेला आदरणीय भेंतेगन मोठ्या संख्येने उपस्थित होता.धम्मपरिषदेचे अध्यक्ष पूज्य भदंत डॉ. उपगुप्तजी महाथेरो(पूर्णा)यांच्या हस्ते धम्मपरिषदेचे उदघाटन करण्यात आले. सध्या लातूर व उस्मानाबाद परिसरात धम्म प्रचाराचा प्रचार व प्रसार करणारे जे भंतेजी आहेत त्यांना नेहमीच मार्गदर्शन भदंत उपगुप्तजी महाथेरो यांचे असते व बहुतांशी त्यांच्याच अध्यक्षतेखाली धम्म परिषदा संपन्न होताहेत.
धम्म परिषदेचे उदघाटन भदंत उपगुप्तजी महाथेरो यांनी केल्यानंतर भंतेजींच्या धम्मदेसनेला सूरवात होण्याअगोदर धम्म परिषदेला सहकार्य करणा—यांचे आयोजकांनी स्वागत करतानाच सत्कार केले दातृत्ववान व कृतुत्ववान धम्म बांधवांचे सत्कार होतांना पाहाणा—यांच्या मनात नक्किच दातृत्वाची भावना जागृत झाली असेल.यामध्ये, बीड येथील उपासक प्रशांत वासनिक यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाची धातूची बुद्ध मूर्ती येथील विहारास दान केल्यामुळे व ठक्कू युवराज गायकवाड यांनी दगडी पाषाणाची आठ फूट उंचीची आणि ईश्वर गायकवाड यांनी अकरा फूट उंचीची बुद्ध मूर्ती दान दिली म्हणून ,त्यांचे प्रचंड जनसमुदायापुढे सत्कार केले गेले.या धम्म परिषदेला उपस्थित राहिलेले भंतेगनास, औसा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे व प्रतिभा सावळे यांनी चिवरदार दान केले म्हणून त्यांचाही आयोजकांनी सत्कार केला तेंव्हा सत्कारमुर्तींच्या चेह—यावरचा आनंद ओसंडून वाहातांना दिसत होता..बुध्दाच्या धम्मात अन्नदानाला खुपच महत्व आहे.या धम्मपरिषदेस दहा हजार बांधव येणार हे संयोजकांनी गृहित धरले होते. धम्म परिषदेला हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या उपासक,उपसीका यांना… सेवानिवृत्त तहसीलदार नागनाथ जाधव यांनी भोजनदान दिले…!
जाधव साहेबांच्या दातृत्वाला निळा सलाम!केलाच पाहिजे.विशेष म्हणजे उल्हासनगर महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणाताई किल्लारीकर यांनी आपल्या गावात संपन्न होत असलेल्या धम्म परिषदेत वेळातला वेळ काढून त्या सहभागी झाल्या होत्या व मनोगत व्यक्त करतांना त्यांनी तक्षशिला बुद्ध विहार किल्लारी येथील विहारास साजेसं असं भंते निवास येणाऱ्या बुद्ध जयंती पर्यंत निर्माण करून देण्याची घोषणा केली. व उपस्थित सर्व भंतेगनास धम्मदान दिले.म्हणून त्यांचाही सत्कार केला.यावेळी किल्लारी येथील व सध्या लातूर येथील नोकरीनिमित्त स्थिरावलेले चर्मकार समाजातील शेवाळे कुटुंब आंबेडकरी चळवळीत काम करते म्हणून व त्यांचे घरात बुध्द व बाबासाहेबांचे वातावरण असलेमुळे संयोजकांनी त्यांचाही सत्कार केला हा सत्कार अनेकांना खुपच भावला.कांही मुस्लिम बांधवांचेही सत्कार झाले ही क्षणचिञे मला खुपच भावली.
यावेळी पुज्य, भदंत डॉ.उपगुप्तजी महाथेरो ,लातुर येथील पुज्य. भदंत पय्यानंद थेरो,बीड येथील पू.भदंत धम्मशील थेरो ,काळेगाव येथील पू.भदंत महाविरो थेरो ,यांनी उपस्थित उपासकांना धम्मदेसना दिली.या धम्मदेसनेमध्ये हजारोंचा जनसमुदाय मंञमुग्ध झाला…!आणि धम्म परिषदेला यासाठीच यायचं असतं…!हेच विचार ऐकल्यावर अंगातील रक्त सळसळतं…!आणि धम्मकार्य करण्याची एक उर्जा मिळते.हिच ऊर्जा एक वर्ष अंगात तापती ठेवत धम्मक्रांतीचा रथ गतीमान करण्यासाठी लढायचं असतं…! हेच बळ या धम्म परिषदेतून मिळालं.भीमराव आंबेडकर यांचे विचार आणि भंतेजेंची ऐकायला मिळालेली धम्मदेसना हेच या धम्म परिषदेचे फलित आहे.
या धम्म परिषदेत खालील प्रमाणे ठराव पारित करण्यात आले १) महाराष्ट्रात हिंदी,संस्कृत विद्यापीठ आहे त्याच धर्तीवर पाली भाषेचे विद्यापीठ विना विलंब स्थापन करावे, २) पाली भाषा जिथे आहे तिथे अनुदान दिले जात नाही त्यास 100 टक्के अनुदान देण्यात यावी ३) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कसबे तडवळे येथे २२/२३ फेब्रुवारी१९४१ रोजी आले होते त्याचे स्मरण म्हणून तेथे भव्य स्मारक उभारावे,४) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कसबे तडवळे येथे येताना रेल्वेने आले त्याला कळम रोड रेल्वे स्टेशन नाव आहे त्याऐवजी डॉ. बी आर आंबेडकर रेल्वे स्टेशन नाव देण्यात यावे,५) तेर —ढोकी तालुका उस्मानाबाद आणि तीर्थ बुद्रुक तालुका तुळजापूर येथील उत्खननात बुद्धमूर्ती शिल्प सापडले आहेत म्हणून उत्खनन थांबवण्यात आले आहे ते तात्काळ सुरू करावे ६) डाॅ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीद्वारे त्यांचे लेखन आणि भाषणे हे प्रकाशन थांबले आहे हे प्रकाशन तात्काळ सुरू करावी,७) युपीएससी, एमपीएससी परीक्षेत पूर्वीप्रमाणे पाली भाषेचा समावेश करावा,८) येत्या जनगणनेत आपण धर्म केवळ बौद्ध लिहावे,९) किल्लारी परिसरात जवळपास 100 गावे आहेत हे लक्षात घेऊन किल्लारी गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा हे ठराव या धम्म परिषदेच्या द्वारे पारित करण्यात आले.
ही धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी आदरणीय भंतेजी धम्मसारजी किल्लारी व गावचे सरपंच युवराज गायकवाड, ईश्वर गायकवाड, प्रकाश कांबळे व त्यांची सर्व टिम व इतर बौध्द उपासक उपासिका यांनी विशेष परिश्रम घेतले आहे त्यांना श्रेय द्यावेच लागेल.
प्रा.राजा जगताप
गाव तेथे बुध्द विहार कादंबरीचे लेखक
उस्मानाबाद
मो.न.९८८११८८२६३
——————————————






