सर्व आदरणीय संपादक/ पञकार संघ/बंधु/सामान्य जनतेला मोर्चात सहभागी होण्याचे जाहिर नम्र आवाहन
केन्द्र सरकार व राज्य सरकार यांच्याविरुद्ध मोर्चा…….
खाजगी हाॅस्पिटल मधील नर्सिंग स्टाफ व संबधित आरोग्य सेवेतील कर्मचारीवर्ग यांच्या वेतन संबधित गंभीर समस्या व गोरगरीब रूग्णांचा खाजगी हाॅस्पिटल मधील भरमसाठ शुल्क वाढीच्या विरोधात लढा एक सामाजिक, दुर्लक्षित, अतिगंभीर प्रश्न……….
चला एक दिवस स्वतः साठीच…… *
आपल्या आरोग्य सेवेतील सहकारी यांच्यासाठीच……
ऐतिहासिक मोर्चात सर्वांनीच सहभागी व्हावे…… – अनिल जायभाये यांचे आवााहन
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
बीड: महाराष्ट्रातील खाजगी हाॅस्पिटल….. मधील नर्सिंग स्टाफ, (नर्सिंग विद्यार्थी, पॅरामेडिकल स्टाफ, लॅबोरेटरीमधील स्टाफ, रिशेपषनिस्ट, मेडिकल वर काम करणारे (होलसेल व चिल्लर), ॲबुंलन्स ड्रायव्हर, डाॅक्टरांचे ड्रायव्हर ,सफाई कर्मचारीवर्ग, स्वयंपाक बनवणाऱ्या मावशी,वार्ड बॉय, (मेहतर ) बाथरूम साफ करणारे कर्मचारीवर्ग, आशा वर्कर्स, आंगणवाडी सेविका,परळी उपजिल्हा रुग्णालयातील कंञाटी नर्सेस व ईतर कंञाटी कर्मचारीवर्ग यांसारखे अनेक खाजगी / निमशासकीय हाॅस्पिटल मधील संघटित/ असंघटित….. सर्व यांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनीच मला आतापर्यंत खुप खुप मदत…. केली आहे.
सहकारी अजय मुंडे यांना आर्थिक मदत,आपण सर्वांनीच मला आपले नौकरी चे (स्पॉट पंचनामा) फाॅर्म भरून दिले, काही डाॅक्टरांचे वाढदिवस पण आपण मिळून साजरे केले, आपण हे सर्व अचानक नाही केले डाॅक्टरांनी आपल्याला कसलाच प्रतिसाद दिला नाही, दुर्लक्षित केले आपण त्यांना निवेदन पण दिलेत सुरूवातीलाच, सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना मी स्वतः भेटलो सुद्धा, विनंती सुध्दा केली आपल्या सर्वांसाठी ते पण काहीच करू शकले नाहीत, आपण संघटित नाही हे पण त्यांना चांगलेच माहिती होते,







