मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुणे: पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितित आज (बुधवार) बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
करमाळा विधानसभेचे माजी आमदार नारायण आबा पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव अरडे, वरवंटे बुद्रुकचे माजी सरपंच नामदेव बनकर, देविदास भोंग, वैभव जामदार, विजय मदने, आंनद यादव, अरविंद बगाडे, अंकुश घनवट, डॉ. विशाल खळदकर, अशोक फडतरे, सोमनाथ माकर, दीपक भांडलकर, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई पाटील यांचा यामध्ये समावेश होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी मंत्री विजय बापू शिवतारे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर, समन्वयक आशिष कुलकर्णी तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.







