• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेबाबत च्या किचकट नियमांच्या बेड्या मुख्यमंत्र्यांनी तोडाव्यात

माणगंगा by माणगंगा
February 8, 2023
in मुंबई
0
बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेबाबत च्या किचकट नियमांच्या बेड्या मुख्यमंत्र्यांनी तोडाव्यात

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेबाबत च्या
किचकट नियमांच्या बेड्या मुख्यमंत्र्यांनी तोडाव्यात
……………………………..
ज्येष्ठ पत्रकार सत्यवान तेटांबे यांचे आवाहन
……………………………..
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी 30 वर्षे पूर्णवेळ पत्रकार म्हणून सेवा केल्याचा एक लिखीत नियम आहे. हा नियम शिथिल करावा.आणि याबाबत असलेल्या या नियमांच्या बेडया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडाव्यात.

घरादारावर तुळशीपत्र ठेवून रात्रंदिवस समाज सेवा करणाऱ्या सर्वच पत्रकारांना या सन्मान योजनेचा लाभ मुख्यमंत्र्यांनी मिळवून दिला पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार सत्यवान तेटांबे यांनी केले. धर्मवीर आनंद दिघे विशेषांक चे संपादक तेटांबे हे आहेत.

या विशेषांकाचे प्रकाशन ठाणे आनंद स्मृति स्थळ येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थित या विशेषांकावर चर्चासत्र झाले त्यावेळेस बोलताना तेटांबे यांनी वरील मागणी केली.चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक दिपक दळवी हे होते.


तेटांबे पुढे म्हणाले सरकार अनेक चांगल्या योजना राबवते. परंतु या योजनांचा लाभ योग्य व्यक्तींना होत नाही.कारण त्या ठिकाणी योग्य व्यक्तींची निवड करणे महत्त्वाचे आहे. नियमावर बोट ठेवून चांगल्या योजनांना फाटे फोडले जात आहेत. वसंतदादा मुख्यमंत्री असताना एक अधिकारी त्यांच्या कानात सांगू लागले,दादा हे नियमात बसत नाही.त्यावर दादा म्हणाले नियमात नसेल तर नियमात बसवा. नियम हे माणसांसाठी बनवलेले असतात. मुख्यमंत्री दादांच्या या प्रत्युत्तरावर तो अधिकारी गारद झाला. दादां प्रमाणे शिंदे हेही झटपट निर्णय घेणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आता बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना निवृत्त पत्रकारांना लागू करण्यासाठी असलेल्या किचकट नियमांच्या बेडया तोडल्या पाहिजेत.30 वर्षे दैनिकात नोकरी करणारा पूर्णवेळ पत्रकार असावा असा नियम या योजनेबाबत आहे, हा नियम शिथिल करावा अशी सर्वच पत्रकार बंधू भगिनींची अपेक्षा आहे असे तेटांबे यांनी यावेळेस सांगितले. महाराष्ट्र जनमुद्राचे संपादक दिपक दळवी म्हणाले ध्येयवादी,ज्येष्ठ पत्रकारांचा बाळ शास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा लाभ झाला पाहिजे. सरकारने नियमावर जरूर बोट ठेवावे. परंतु आपण अयोग्य माणसाला या सन्मान योजनेचा लाभ देत नाही ना? असा सवालही दळवी यांनी केला. धर्मवीर आनंद दिघे विशेषांकावरील चर्चासत्रास महाराष्ट्र जनमुद्रा चे संपादक दिपक दळवी, आनंद दिघे यांचे मित्र डाॅ. कर्मवीर गोडसे, डाॅ.सदानंद विचारे, कुटुंब रंगलय काव्यात फेम विसुभाऊ बापट,आनंद दिघे यांचे चाहते कवी लेखक अण्णा धगाटे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, आदिवासी सेवक गंगाधर म्हात्रे,अशोक उतेकर, विष्णू यादव, अनिल मुकणे आदींसह आनंद दिघे यांचे हजारो चाहते याप्रसंगी उपस्थित होते. धर्मवीर आनंद दिघे विशेषांकाचे मुल्य ₹ 200 आहे.अंक मिळवण्यासाठी-
साक्षीदार प्रकाशन,सत्यवान तेटांबे डी/303, क्रेमलिन जयराज नगर बोरिवली पश्चिम मुंबई-91
मोबाईल:9869501368 या पत्त्यावर संपर्क करावा….!

Views: 200
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
वडूज सातारा येथे होणार मराठी साहित्य संमेलनखासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार

वडूज सातारा येथे होणार मराठी साहित्य संमेलन
खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)