मी आंदोलनाला येतेय
मेघा घाडगे
सिने स्टार
मुंबई ;
गेल्या दीड वर्षापासून डोळ्याला न दिसणाऱ्या एका विषाणू ने अनेकांचे डोळे पाणावले, कित्येकांनी कायमचे मिटलेही… या काळात संपुर्ण महाराष्ट्राचे जगणे विस्कळीत झाले… सरकारने काही स्तरांसाठी तरतुदी केल्या….पण आम्हा रंगकर्मींचे काय ? काही संस्थानी आम्हाला मदतीचा हात पुढे केला…राशन म्हणा, काहींनी थोडे का होईनात पैसेही दिले , काहींनी हॉस्पिटलसाठीही मदत केली. मायबाप सरकारने आमच्या साठी काय केले? हा प्रश्न आम्हा रंगकर्मींना अस्वस्थ करतो.
आता आम्हाला,आमची लाज वाटू लागली आहे.
मायबाप सरकार, आम्ही भिकारी नाही.
आम्ही कलावंत आहोत या भूमीतले.
महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा मनापासून प्रयत्न करणारे रंगकर्मी.
जनसामान्यांना मनोरंजनातून निखळ आनंद देणारे रंगकर्मीं.
तरीही महाराष्ट्रात सरकार दरबारी आम्हां रंगकर्मींची साधी नोंद नाही ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.
म्हणूनच हे आंदोलन.
आमचं आंदोलन ना कोणत्या पक्षाशी आहे,ना कोणत्या नेत्यांशी, ना ही कोणत्या जातीधर्माशी आम्ही कलाकार आहोत,आम्ही रंगकर्मी आहोत.
रंगकर्मींच्या हक्कासाठी…*
रंगकर्मींच्या भविष्यासाठी…*
रंगकर्मींच्याअस्तित्वासाठी…*
मी आंदोलनाला योतोय…
मी एक रंगकर्मी*
*रंगकर्मी_आंदोलन#महाराष्ट्र *