• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सायबरमधील लेटेस्ट फ्रॉड प्रकार – सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी

माणगंगा by माणगंगा
March 5, 2023
in मुंबई
0
सायबरमधील लेटेस्ट फ्रॉड प्रकार – सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी

सायबरमधील लेटेस्ट फ्रॉड प्रकार – सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी

जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुणे: तुम्हाला एक मेसेज येतो जो वाचताना सुकृत दर्शनी तो बँकेकडून आल्यासारखाच अधिकृत वाटतो. ज्यात म्हटलं जात की, तुमची अमुक तमुक बँकेतील खाते ब्लॉक करण्यात आले आहे. जर तुम्हाला ते पुन्हा सुरु करायचे असेल तर तुमचा पॅन नंबर अमुक तमुक साईट ची लिंक देतोय तिथं जाऊन अपडेट करा !

खरतर हा फ्रॉड चा सापळा असतो. अंधारात दगड मारायचा…. लागला कुणाला तर लागला या प्रकारचा हा फ्रॉड !
असा मेसेज दहा जणांना पाठवला तर त्यातील किमान दोन चार जणांचे “त्या” बँकेत खाते असतेच ! आणि नेमके ते लोक मग सापळ्यात अडकतात.
आता तुम्हाला वाटेल की पॅन नंबर अपडेट केल्याने फ्रॉड कसा होईल ?
तर सांगतो….


मुळात तुम्ही त्या लिंक ला क्लिक करणे हेच मुळात धोक्याचे ठरू शकते.
कारण एक तर त्या लिंकमध्येच इनबिल्ट व्हायरस लिंक्ड असू शकतो.
जो तुम्ही लिंक ला क्लिक केले तुमच्या मोबाईलमध्ये तो व्हायरस घुसतो आणि मग तुमच्या मोबाईलमधील डेटा / फोटो / व्हिडीओ सगळे चोरू शकतो. आणि मग नंतर त्याच्या आधारे तुम्हाला आर्थिक अथवा मानसिक रित्या ब्लॅकमेल केले जाते. म्हणजे उदा. तुमच्याच गॅलरीतील एखादा तुमचा फोटो घेऊन तो मॉर्फिंग करून नंतर तुम्हाला पाठवून
“इतके पैसे द्या नाहीतर हा फोटो सोशल वर व्हायरल करू”
असं सांगितलं जात. आणि तुम्ही सामाजिक इज्जतीच्या दृष्टीने घाबरून पैसे देऊन टाकता. गंमत म्हणजे हे लोक एकदम पन्नास हजार एक लाख रुपये अशी मोठी रक्कम मागत नाहीत तर दोनपाच हजार इतकीच मागतात. तुम्हाला वाटत की थोडक्यात भागतेय अन इज्जत वाचतेय म्हणून तुम्ही ते देऊन टाकता आणि समोरून नंतर कळवलं जाते की


“ओके तुमचा तो फोटो डिलीट केला आहे”


तुम्हीही रिलॅक्स होता. मात्र चार आठ दिवसानंतर दुसऱ्याच नम्बरवरून तोच फोटो तुम्हाला पाठवून पुन्हा ब्लॅकमेल केलं जाते आणि अशारितीने दोन महिन्यात एकूम मिळून लाखभर रुपयाला चंदन लावले जाते.
किंवा दुसरा धोका म्हणजे…. तुम्हाला त्या लिंकवर विविध माहिती भरायला लावताना एका विशिष्ठ वेळी…. म्हटलं जातं की “आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो इथं द्या” खरेतर तोपर्यंत वरची जी माहिती तुम्ही अपडेट करत आलेला असता त्यातच तुमच्या खात्याचा नम्बर व इतर डिटेल्स दिलेलं असतात. हॅकर त्याच्या मोबाईलवरून तिकडून तुमच्याच खात्यावर पैसे काढण्यासाठी लॉग इन झालेला असतो आणि त्यावेळी तुम्हाला मग ओटीपी जो येतो तो खरंच बँकेकडूनच असतो जो तुम्ही त्या समोरच्याला नकळत देऊन टाकता आणि तोच ओटीपी वापरून समोरचा माणूस दोन सेकंदात तुमचं खात साफ करतो.


धोका हा आहे !
मग आता यावर उपाय काय ?


सोप्पा उपाय आहे. ज्यांचे खातेच मेसेजमधल्या त्या बँकेत नाही त्यांनी या मेसेज ला एंटरटेन करू नये. जमलंच तर त्याविरुद्ध सरळ ऑनलाईन सायबर सेल कडे तक्रार करावी. जेणेकरून इतर कुणाची फसवणूक होणार नाही. आणि तितकं नाही जमलं तर किमान तो नंबर तरी तुम्ही ब्लॉक करावा.
आणि ज्यांचे खरेच त्या मेसेज मधील बँकेत खाते असेल त्यांनी स्वतः त्या तुमच्या बँकेत जाऊन खात्री करून घ्यावी की खरेच बँकेने असं काही पाठवलं आहे का ? तेव्हा १००% खात्रीने सांगतो बँकेचे लोक सांगतील की…. असं काही त्यांनी पाठ्वलेच नाहीय. कारण अशी कोणतीही गोष्ट बँक मेसेजद्वारे करत नाही. फारतर फार ईमेल द्वारे सूचना देते.फिजिकली तुम्ही बँकेत गेल्याने पुढील सगळेच धोके संपतात आणि तुम्ही सुरक्षित राहता असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी , धनंजय देशपांडे,पुणे यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.
Views: 157
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
जेष्ठ नागरिक संघ, झरे ची एन. एस. एस. शिबिरास, विरळी येथे सदिच्छा भेट

जेष्ठ नागरिक संघ, झरे ची एन. एस. एस. शिबिरास, विरळी येथे सदिच्छा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)