• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अखेर कोंडी फुटली; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

माणगंगा by माणगंगा
March 20, 2023
in मुंबई
0
अखेर कोंडी फुटली; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

अखेर कोंडी फुटली; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई ता.२०: जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सातव्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर यांनी याबाबत माहिती दिली. तसंच उद्यापासून कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याबाबत आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सकारात्मक झाली आहे, राज्यात लवकरच जुनी पेन्शन योजना सुरु होणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले.


बैठकीनंतर बोलताना विश्वास काटकर म्हणाले, राज्यातील सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी अभेद्य एकजूट दाखवली. यात कोणताही भोंगळपणा नव्हता, हिंसा नव्हती. हा संप या कर्मचाऱ्यांनी यशस्वी करुन दाखविला.

आज मुख्यमंत्र्यांबरोबर आमची सविस्तर चर्चा झाली आणि ही चर्चा यशस्वी झाली. कारण आमची मूळ मागणी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करा अशी होती.शासनाने यासंदर्भात मागील सात दिवसांत वेगवेगळी पावलं उचलली. आज सरकारकडून आम्हाला सांगण्यात आलंय की याबाबत ते गंभीर विचार करत आहेत. यासंदर्भात सरकारनं समिती नेमली आहे. ती समिती सुरुवातीला आम्ही नाकारली होती. पण आज सरकारने एक प्रस्ताव दिला. त्यानुसार प्रिन्सिपल म्हणून जुन्या पेन्शन योजनेची मागणी स्वीकारण्यात आली.जुनी आणि नवी पेन्शन योजना यात मोठं अंतर होतं. यापुढे सर्वांना समान निवृत्तीवेतन मिळेल, त्यात अंतर राहणार नाही, अशा स्वरुपाची लेखी भूमिका शासनाने कळवली आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात सुरू होईल. ही योजना निकोप होण्यासाठी समिती त्याबाबत विचार करेल”


संपकालावधीत आमच्या खात्यावरील उपलब्ध रजा मंजूर करून हे 7 दिवस नियमित करण्यात येतील. तसंच ज्यांना कारवाईसंदर्भात नोटीस गेल्या, त्या मागे घेण्यात येतील, असं आश्वासनही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती विश्वास काटकर यांनी दिली. यावेळी काटकर यांनी उद्यापासून महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावं, असं आवाहन केलं. ते म्हणाले, ज्या ठिकाणी गारपीट झाली आहे, जिथं शेतकरी अडचणीत आहे तिथं तातडीने कशी मदत मिळेल यासंदर्भात विशेष काम करावं. रुग्णालयात तुमच्या गैरहजेरीमुळे ज्या अडचणी आल्या असतील त्यावर तातडीने काम करावं, अशा सूचना सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

Views: 373
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या एकत्रित मेळावा दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी होणार ! शेख निजाम,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, गट, बीड,

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या एकत्रित मेळावा दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी होणार ! शेख निजाम,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, गट, बीड,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)