पत्रकाराचा दणका, मनसे नेत्याविरोधात गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
डोंबिवली मनसेचा नेता गजानन पाटील, बोगस बिल्डर माणिकप्रसाद शुक्ला आणि इतर यांचेविरोधात तब्बल दीड वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मानपाडा पोलीसांत बनावट शासकीय दस्तऐवज बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. *फ्री प्रेस ऑनलाईन न्यूजने या प्रकरणात गेले वर्षभर पाठपुरावा करून शासकीय यंत्रणेला हा गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडले आहे.
डोंबिवली पूर्व येथील लोढा हेवन आणि निळजे भागात जिल्हाधिकारी कार्यालयाचे बोगस सहीशिक्के वापरून शकुंतला बिल्डर्स व डेव्हलपर्सच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामातील फ्लॅट विकत, अनेक मराठी माणसांनाच लाखोंचा चुना लावणारा स्थानिक मनसेचा नेता गजानन पाटील आणि इतर यांचेविरोधात मानपाडा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासाठी फ्री प्रेस ऑनलाईन न्यूजने जिल्हाधिकारी ठाणे कार्यालय, जिल्हा परिषद ठाणे आणि इतर शासकीय कार्यालयात गेली सुमारे दोन वर्षे पाठपुरावा केला होता.
सध्या दाखल झालेल्या FIR मधे जरी या बोगस नेत्याचे आणि बिल्डरचेच नाव असले तरी या प्रकरणात डोंबिवलीतील रजिस्ट्रार आणि या बिल्डर्सच्या माध्यमातून कर्जपुरवठा करून सामान्य ग्राहकांना खड्ड्यात घालणारे बँक मॅनेजर्स हेही सामील आहेत. त्यांची नावेही आरोपपत्रात दाखल करून त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे यासाठी यापुढे फ्री प्रेस ऑनलाईन न्यूज प्रयत्नशील राहील.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता जामीनासाठी जेव्हा हे आरोपी कोर्टात जातील तेव्हाही फ्री प्रेस ऑनलाईन न्यूजकडून जनहितार्थ त्यांच्या जामीनाला विरोध केला जाईल, प्रसंगी वरिष्ठ न्यायालयात त्यासाठी अपिल केले जाईल.
याशिवाय केडीएमसी हद्दीत या बोगस नेत्याने जेवढी बेकायदेशीर कामे केली असतील, त्याचाही छडा लावून त्याच्यावर कारवाईचा बडगा सतत चालविला जाईल यासाठी आम्ही काम करू.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्यांकडून अशा प्रकारचा घोटाळा झालेला असताना आजअखेर पक्षाने त्याला पाठीशी घालायचे काम करून, मनसे ही मराठी माणसाच्या हितासाठी काम करीत असल्याच्या वल्गनांवर पाणी पडले आहे.
जय महाराष्ट्र म्हणत मराठी माणसालाच गंडा घालणाऱ्या या नेत्यावर पक्षाने अजूनही हकालपट्टीची कारवाई केली नाही तर त्याची किंमत कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमधे मनसेला मोजावी लागेल. मराठी माणसाला चुना लावणाऱ्या या नेत्यांचे खरे रूप निवडणुकांमधे जनतेसमोर आणण्यासाठी आम्ही काम करू हे निश्चित पत्रकार श्री. रमेश नामदेव देवरूखकर यांनी असा निर्धार केला आहे.