• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, November 10, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मांडकी हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न…! कार्यसम्राट आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या उपस्थितीत मांडकी हनुमान जन्मोत्सव थाटात संपन्न. .. !

माणगंगा by माणगंगा
April 12, 2023
in मुंबई
0
मांडकी हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न…! कार्यसम्राट आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या उपस्थितीत मांडकी हनुमान जन्मोत्सव थाटात संपन्न. .. !

मांडकी हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न…! कार्यसम्राट आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या उपस्थितीत मांडकी हनुमान जन्मोत्सव थाटात संपन्न. .. !

कार्यसम्राट आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या उपस्थितीत मांडकी हनुमान जन्मोत्सव थाटात संपन्न. .. !

मांडकी,चिपळूण (प्रतिनिधी-सत्यवान तेटांबे)
नुकताच हनुमान सेवा मंडळ, मांडकी येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा चिपळूण, संगमेश्वर चे कार्यसम्राट आमदार सन्माननीय शेखर गोविंदराव निकम, ज्येष्ठ पत्रकार सत्यवान तेटांबे, सिने-नाट्य कलाकार, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, उद्योगपती दिलीप तेटांबे, उद्योगपती विनायक वासुदेव वडकर, दत्ताराम तुकाराम निकम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मांडकी गावातील प्रसिद्ध कुस्तीगीर महादेव तेटांबे यांच्या वडिलांनी म्हणजे कै. तात्या तेटांबे यांनी 200 वर्षांपूर्वी या श्री हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना करून ग्रामस्थांना मंदिर उपलब्ध करून दिले. पुढे या मंदिरात अनेक उत्सव समारंभपूर्वक साजरे होऊ लागले. याच वास्तूत मांडकी ग्रामस्थ तसेच इतर गावातून अनेक हनुमान भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित होते.


हा हनुमान जन्मोत्सव सोहळा यशस्वी व्हावा म्हणून सर्वश्री विनायक वासुदेव वडकर, दत्ताराम तुकाराम निकम, चंद्रशेखर अनंत पाणिन्द्रे, दिलीप परशुराम तेटांबे यांनी आर्थिक सहकार्य करून आलेल्या भाविकांना दोन दिवस अन्नप्रसाद देण्याची व्यवस्था केली.


आर्थिक सहकार्य मिळविण्याकरिता सर्वश्री ओमप्रकाश भंडारी, दत्तात्रय हडदे, शिवराम भंडारी, संजय तेटांबे यांनी अथक प्रयत्न केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री सत्यवान तेटांबे आणि समाजसेवक श्री गणपत भंडारी यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच यावेळी स्थानिक भाविकांचा सुमधुर भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री उत्तम तेटांबे, गणेश पाणिन्द्रे, महेंद्र तेटांबे, विश्वनाथ तेटांबे, संतोष तेटांबे, विजय तेटांबे, राजू तेटांबे, मनोज तेटांबे, दत्ता तेटांबे, जितेंद्र तेटांबे, नितीन तेटांबे, उमेश शिर्के, त्याचप्रमाणे मांडकी हनुमान सेवा महिला मंडळ आणि समस्त तेटांबे, भंडारी आदी सर्व मांडकीकरांनी विशेष परिश्रम घेतले. सुधीर लक्ष्मण तेटांबे यांनी दोन दिवसीय सुरु असलेल्या या भाविक सोहळ्याचे आपल्या रसाळ वाणीने सूत्रसंचालन करून उपस्थित भाविकांची मने जिंकून घेतली. अशा तऱ्हेने मांडकी हनुमान सेवा मंडळाचा श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात भाविकांच्या गर्दीत संपन्न झाला.

Views: 264
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पत्रकार महामंडळ स्थापण्यासाठी केंद्राच्या हालचाली ? ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पुढाकारातून होणार कामाला सुरुवात…….राज्यातल्या महामंडळाला शंभर कोटी देण्याची मागणी.

पत्रकार महामंडळ स्थापण्यासाठी केंद्राच्या हालचाली ? ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पुढाकारातून होणार कामाला सुरुवात.......राज्यातल्या महामंडळाला शंभर कोटी देण्याची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)