खरवते कोष्टी समाज मंडळाकडून चिपळुण येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप.
————————————-
–राजापुर(गुरुनाथ तिरपणकर)-
आकाश फाटलय ठिगळ कुठे कुठे लावणार, अशी परिस्थिती पुरग्रस्तांची झालेली आहे. पण माणुसकी अजुन जीवंत आहे. कोकणातील माणुस हार मानत नाही. सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. आपणही काहीतरी खारीचा वाटा उचलला पाहीजे. अस “कोष्टी समाज “ग्रुपला वाटल,त्यासाठी प्रसाद गुरसाळे यांची मदतीसाठी आर्त हाक येते.धनिक,गर्भश्रीमंत सोडुन द्या, पण सर्वसाधारण,मध्यमवर्गीय-तळागाळातील कोष्टी समाज जागा होतो. आणि निधी जमा करण्याची जबाबदारी खरवते कोष्टी समाजमंडळावर येऊन पडते.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ही जबाबदारी ते लीलया पेलतात.मंडळाचे अध्यक्ष श्री.भास्कर गुरसाळे यांच्यानेतृत्वाखाली आर्थिक मदत मिळत गेली.हा निधी खरवते,
कळसवली,जुवाटी,खारेपाटण,निवळी,कणकवली,रत्नागिरी, मुंबई आदी ठिकाणच्या बांधवांकडुन अल्पावधीतच जमा झाला.या निधी संकलनाचा कोष्टी समाज बांधवांकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.जमा झालेल्या पैशातून जीवनावश्यक वस्तु व इतर घरउपयोगी वस्तुंचे कीट तयार करण्यात आले. व ते कीट गरजवंत पूरग्रस्तांना देण्यात आले. दत्ता उबाळे यांनी विनाशुल्क आपला टेम्पो दीला,व तेही या सत्का-यात सहभागी झाले.तसेच विशाल नि मणकर,वसंत सवादे,संकेत गुरसाळे, दीप्ती निमणकर,डाॅ.अमृत,अजित गुरसाळे, डाॅ.पुजा गुरसाळे तसेच खरवते कोष्टी समाज मंडळातील बंधु-भगिनींचे विशेष सहकार्य लाभले. दिव्याने दिवा लावत गेल कि दिव्यांची दीपमाळ होते,फुलाला फुल जोडत गेल की फुलांचा फुलहार तयार होतो.तसेच माणसाला माणुस जोडत गेल की माणुसकीचे एक सुंदर नात तयार होत.अशीच ही गुंफण खरवते कोष्टी समाज मंडळाने केली व सामाजिक बांधिलकी जपली.हेच आत्मिक समाधान.शेवटी तेथील पूरग्रस्तांना मदत करुन हे कोष्टी समाज बांधव परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन धीर-गंभीर उद्विग्न मनाने राजापुरला परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले.