• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पंतप्रधान मोदी यांच्यासाठी “भ्रष्टाचारियों के ‘दाग अच्छे हैं” बस वो भाजपा में आ जाए : धनंजय रामकृष्ण शिंदे, आप महाराष्ट्र नेते.

माणगंगा by माणगंगा
July 5, 2023
in मुंबई
0
पंतप्रधान मोदी यांच्यासाठी “भ्रष्टाचारियों के ‘दाग अच्छे हैं” बस वो भाजपा में आ जाए : धनंजय रामकृष्ण शिंदे, आप महाराष्ट्र नेते.

पंतप्रधान मोदी यांच्यासाठी “भ्रष्टाचारियों के ‘दाग अच्छे हैं” बस वो भाजपा में आ जाए : धनंजय रामकृष्ण शिंदे, आप महाराष्ट्र नेते.

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

काल महाराष्ट्राचा राजकारणात अजून एक भ्रष्टाचाराचा भूकंप झाला प्रत्येक भ्रष्टाच्याऱ्याला आम्ही पक्षात घेऊ आणि त्याच्यावरची कार्यवाही बंद करू अशा पद्धतीने भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रात जे गलिच्छ राजकारण सुरू केले आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील 13 करोड जनतेवर होत आहे आणि दूरपर्यंत होणार आहे, संविधानाची पायमल्ली करून आपल्याला सोईस्कर होईल या पद्धतीने कायद्याची तोडमोड करून सत्ता कशी ताब्यात घेता येईल हे भाजपा करीत आहे, अनेक आमदार आणि खासदारांच्या बाबतीत भाजपा षडयंत्र करून, पैसा देऊन, ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून आज महाराष्ट्रातील तमाम भ्रष्टाचाऱ्याना बीजेपी आपल्या पार्टीत घेत आहे.

शिंदे, राणे, अजित पवार असे वेगवेगळे मोहरे वेगवेगळ्या आघाडीवर पाठवून मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस त्यांना व्यवस्थीत हाताळत आहेत, भ्रष्टाचाराने माखलेले चेहरे घेवून भाजपा देश्यात अस्थिरता निर्माण करीत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घटनांमुळे संतप्त व दु:खी झालेल्या जनतेने हे जाणून घेतल पाहिजे की भारतातील पारंपरिक पक्षांचे नेते जनतेच्या सेवेसाठी राजकारणात नाहीत. ते सत्ता, भ्रष्टाचार, प्रसिद्धी, आर्थिक फायद्यासाठी राजकारणात आहेत ते विचारधारा, पक्ष किंवा लोकांशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत. ते लोक सेवेमुळे नाही तर त्यांच्या जाती, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि पैशाच्या ताकदीमुळे निवडून आले आहेत. अशा राजकारण्यांना भाजपा ईडी, सीबीआय, आयटीच्या रडारखाली वाकवून पक्ष बदलण्यास किंवा आपल्याला सपोर्ट करण्यास भाग पाडत आहे.

परंतु महाराष्ट्रातील जनतेला “आम आदमी पार्टी” म्हणजे आशेचा किरण आहे, आप एकमेव असा पक्ष आहे जो सीबीआय आणि ईडीच्या चुकीच्या कार्यवाहीनंतरही अखंड आणि वैचारिकदृष्ट्या एकजूट आहे. चिखलाच्या राजकारणात आदर्श म्हणून उभे राहण्याची फक्त आप कडे ताकद आहे, महाराष्ट्राच्या जनतेला सुगीचे दिवस फक्त आम आदमी पार्टीच आणू शकते, कारण भ्रष्ट राजकारणात आप सारखा एकमेव प्रामाणिक पक्ष हा लोकांचे भले करू शकतो आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली आणि पंजाब मध्ये आप ने जे सामान्य लोकांसाठी काम करून दाखविले आहे तोच जनतेसाठी मोठा पुरावा आहे.

या प्रस्थापितांच्या विश्वासघातकी, स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारणाच्या विरोधात सर्व जनतेला एकत्र येऊन लढावे लागेल व मत पत्रिकेतून या सर्व प्रस्थापित भ्रष्ट राजकारण्यांना उत्तर द्यावं लागेल असे वक्तव्य आम आदमी पार्टी महाराष्ट्रचे नेते मा. धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी दिली.

या पत्रकार परिषदेस आम आदमी पक्षाचे राज्याचे नेते मा. धनंजय रामकृष्ण शिंदे यांच्या सोबत विभागीय नेते मा. मधुकर फर्डे, जिल्हा अध्यक्ष मा. मुरालीलाल पचौरी, उपाध्यक्ष मा सतीश सलुजा, जिल्हा प्रवक्ता सौ. अक्षरा पटेल, शहर कार्याध्यक्ष मा. अशोक वाल्मिकी, रमेश वर्मा, हर्षल घाडगे, डोंबिवली कार्याध्यक्ष विनोद गुप्ता, बदलापूर अध्यक्ष कैलास कटके, मीडिया प्रमुख अमर आमटे, सोशल मीडिया प्रमुख अशोक यादव इत्यादी नेते उपस्थित होते.

Views: 160
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
प्रश्न कामगारांचा मार्ग तिथे मनसेचा….!!

प्रश्न कामगारांचा मार्ग तिथे मनसेचा….!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)