• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव पूर्व येथे तिव्र आंदोलन. .. !

माणगंगा by माणगंगा
July 23, 2023
in मुंबई
0
प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव पूर्व येथे तिव्र आंदोलन. .. !

प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव पूर्व येथे तिव्र आंदोलन. .. !

मुंबई (गोरेगाव -प्रतिनिधी महेश्वर तेटांबे)


दिनांक २१ जुलै, २०२३ रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०० सभासदांना घेऊन दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव पूर्व येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या जागरूक सभासदांमार्फत तीव्र आंदोलन करण्यात आले. महामंडळाचे सभासद वासू पाटील (कला दिग्दर्शक) हे गेली २५ ते ३० वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत असं असुन त्यांना प्रवेशद्वाराजवळ अडवणूक केली जाते शिवाय प्रसिद्ध अभिनेते श्री अमोल कोल्हे यांनी मला बोलावले आहे असे सांगून सुद्धा ऐकून न घेण्याच्या मनःस्थितीत असलेल्या सुरक्षारक्षकांची अरेरावी आणि हुकूमशाही चालूच होती तेव्हा ही मराठी चित्रपट महामंडळाच्या दृष्टीने लज्जास्पद आणि निषेधार्थ बाब असुन मराठीशाहीची होणारी गळचेपी म्हणावी लागेल

तेव्हा हे कुठेतरी थांबलं पाहिजे नाहीतर मराठी माणूस हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही. कारण आज ही घटना एका सभासदाच्या बाबतीत घडली आहे उद्या कुणाच्याही बाबतील घडू शकते तेव्हा ही शक्यता नाकारता येत नाही तेव्हा त्यासाठी ठोस उपाययोजना आखणे हे गरजेचे आहे. तेव्हा या संदर्भात श्री विजय भा.भालेराव व्यवस्थापक (कल्लागारे) महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम) दादासाहेब फाळके चित्रनगरी, यांना अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या जागरूक सभासदांच्या वतीने एक निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात कला दिग्दर्शक वासू पाटील यांना दादासाहेब फाळके चित्रनगरी प्रवेशद्वाराजवळ प्रवेश नाकारला व त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली या संदर्भात सुरक्षारक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी विजय भा.भालेराव यांनी झालेल्या गैर प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करून त्याची पुनरावृत्ती होऊ नये यांबाबत चित्रनगरीचे संचालक (एम.डी.) अविनाश ढाकणे साहेब यांना घडलेला वृतांत सांगून त्यांवर योग्य ती कारवाई करावी असे सांगितले.

आणि यापुढे महामंडळाच्या कुठल्याही मराठी कलाकारांना अथवा तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने प्रवेशबंदी करू नये अशी सूचना फिल्मसिटी मधिल सर्व सुरक्षारक्षकांना देण्यात येईल असे ही सांगण्यात आले. याप्रसंगी दिग्दर्शक दिपक कदम, विजय राणे, चंद्रशेखर सांडवे, आर्यन देसाई, विनय गिरकर, गणेश तळेकर, विजय निकम, शिरीष राणे, विनोद डावरे, प्रफुल्ल ओमकार, अभिनेत्री सिद्धी कामथ, संकलक यश सुर्वे, वेस्टर्न इंडिया प्रोड्युसर असोशिएशनचे सरचिटणीस दिलीप दळवी, कार्यकारी निर्माते प्रमोद मोहिते, निर्मिती व्यवस्थापक यशवंत कुलकर्णी, देवेंद्र मोरे, अभिनेते सचिन घाणेकर, घनश्याम गोवेकर, सागर मयेकर, प्रवीण मोहिते, हरी जनार्दन सोनवडेकर, विनायक शानबाग, तुषार खेडेकर, नितीन पाटील, निर्माता संतोष राऊत तसेच आदी सभासद उपस्थित होते.

Views: 209
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
शिरपूर शहरात यंदा अधिक मासामुळे बाप्पा येणार उशिरा…..प्रत्येक धार्मिक उत्सव येणार उशिरा; डॉ प्रा. दिलवरसिंग गिरासे यांची माहिती

शिरपूर शहरात यंदा अधिक मासामुळे बाप्पा येणार उशिरा.....प्रत्येक धार्मिक उत्सव येणार उशिरा; डॉ प्रा. दिलवरसिंग गिरासे यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)