• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बनावट व्हिडीओ कॉलचा आणखी एक सायबर फ्रॉड – ⓒ अॅड. चैतन्य एम. भंडारी

माणगंगा by माणगंगा
July 28, 2023
in मुंबई
0
बनावट व्हिडीओ कॉलचा आणखी एक सायबर फ्रॉड – ⓒ अॅड. चैतन्य एम. भंडारी

बनावट व्हिडीओ कॉलचा आणखी एक सायबर फ्रॉड – ⓒ अॅड. चैतन्य एम. भंडारी

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक नवीन युगाचा आविष्कार आलाय. अनेकांना हा उपयुक्त ठरतो आहे मात्र चुकीच्या लोकांच्या हातात हा आविष्कार पडल्यावर काय होते ते आज पाहूया !

तुम्हाला तुमच्याच परिवारातील किंवा परिचयातील एखाद्या व्यक्तीचा व्हिडीओ कॉल येतो अन “अचानक एक अडचण आलीय तर प्लिज मला वीस हजार रुपये पाठवून दे. मी एक दुसरा नंबर पाठवतो त्यावर जी पे कर ! उद्या बँकेतून काढून तुला लगेच परत देतो” असं तुम्हाला समोरची व्यक्ती म्हणते. अनेकदा ती व्यक्ती म्हणजे तुमचा जीवनसाथीच असतो. उदा. बायकोला जर नवऱ्याकडून असा कॉल आला तर बायको तरी कशाला जास्त खोलात जाईल न ? ती बिचारी लगेच नवऱ्याला वीस हजार रुपये जी पे करून मोकळी होते.
आणि संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला विचारते की, अचानक अशी काय अडचण आली वीस हजारांची मला मागितलेत ते , तेव्हा नवरा म्हणतो की,
“मला कसली अडचण आलीय ? मी कशाला दहा हजार तुला मागू ? आणि मग बायकोचे धाबे दणाणते पायाखालची जामी सरकते आणि मग कळत की, तो व्हिडीओ कॉल नवऱ्याने केलाच नव्हता तर त्याचा फक्त फोटो वापरून आर्टिफिशियल इंटेलजन्सचा मदतीने ऍपद्वारे एडिट करून त्याच्या तोंडून ते शब्द उच्चारले गेलेत असं क्रिएट केलं जाते.

(ऍनिमेशन कसे केले जाते अन नंतर आवाज डब करून जोडला जातो तसे) आणि मग तुम्ही तो कॉल “खरा की खोटा” हे न पाहता पॅनिक होऊन पटकन पैसे देऊन बसता अन जाळ्यात अडकता. हे सायबर हॅकर लोक तुमच्या सोशल मीडियावरील हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असतात जेणेकरून त्यांच्याकडे तुमच्याबद्दलची आर्थिक / कौटुंबिक माहिती जमा केलेली असते आणि त्या आधारे ते सापळा रचतात. तुमचेच फोटो / व्हिडीओ / रिल्स डाऊनलोड करून घेऊन त्यात “एआय” च्या मदतीने बदल करून असे बनावट व्हिडीओ कॉल केले जातात. आणि आपलाच नेहमीच माणूस आहे असं समजून तुम्हीही फारशी बाकी खात्री न करून घेता पैसे देऊन मोकळे होता. आता गंमत म्हणजे इथं मी उदाहरण म्हणून वीस हजार रुपये सांगितले ! मात्र तुमच्या सोशल प्लॅटफॉर्मवर तुमची आर्थिक स्थिती कशी आहे

हे सहज कळू शकते त्यावरून हीच वीस हजार ची रक्कम पन्नास हजार / लाखभर रुपये पण असू शकते. तुम्ही कौतुक म्हणून नवी कार घेतल्याचे, नवीन फ्लॅट घेतल्याचे, बँकॉक मलेशिया टूरचे फोटो सोशल वर टाकलेले असतात ते फक्त तुमची फ्रेंडलिस्ट मधील मंडळीच पाहतात असं नाही तर हे सो कॉल्ड व्हाईट कॉलर गुन्हेगार देखील पाहतात आणि त्यावर सापळा रचला जातो. ज्यात तुमच्या घरच्या लोकांच्या मदतीने तुम्हाला लुटलं जाते. आणि असे प्रकार वरचेवर वाढतील हा इशारा मी आताच देऊन ठेवतो. आजवर हनी ट्रॅप सारखे जे जे इशारे इन ऍडव्हान्स दिलेत ते ते नंतर सर्वाना प्रत्यक्षात पाहायला मिळालेत. तसाच हा बनावट व्हिडीओ कॉल चा धोका वरचेवर वाढणार आहे. हे सांगून ठेवतो. मग आता यावर उपाय काय ? तर सोप्पा उपाय आहे. असा जर व्हिडिओ कॉल आला तरी काळजी करू नका.

आणि मुख्य म्हणजे पॅनिक होऊ नका की अचानक आपल्या माणसाला असं काय संकट आलं की इतके पैसे लागत आहेत ? एकदम शांत राहा. त्या कॉल वर फार तर उत्तर द्या की, “ओके. पैसे पाठवतो / पाठवते” म्हणा अन कॉल कट करा. आणि नंतर समोरून ज्या व्यक्तीने कॉल केला होता त्याला तुम्ही तुमच्या मोबाईलवरून साधा कॉल करून विचारून घ्या की “काय अडचण आलीय पैशाची” तेव्हा आपोआप तुम्हाला कळेल की तो व्हिडिओ कॉल बनावट होता कारण तुमचा माणूस तुम्हाला सांगेल की “मी नाही कसला कॉल केलेला” आणि मग तुमची फसवणूक होण्याचा धोका राहणार नाही आणि समजा खरोखरच तुमच्या माणसाने व्हिडिओ कॉल तसा केला असेल तरी नंतर तुम्ही साधा कॉल केला तर तो सांगेलच की, “हो अडचण आलीय ! जरा पैसे पाठव” मग पैसे पाठवा वाटलं तर ! पण खात्री कसली न करता पैसे पाठवू नका आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियावर इतकं पण सगळं लोकांना दाखवत बसू नका की ज्यामुळे तुम्हीच नंतर हॅकरच्या हाती सापडाल.सोशल मीडिया या नावातच “सोशल” अपॆशीत आहे. पर्सनल नाही, हे लक्षात घ्या !

काळजी घ्या जागृत राहा असे आवाहन सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष व ख्यातनाम सायबर तज्ञ अॅड. चैतन्य एम. भंडारी , सायबर अवेअरनेस फाऊंडेशनचे सदस्य धनंजय देशपांडे,पुणे यांनी तमाम नागरीकांना व जनतेला केले आहे.

Views: 169
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
भाजप खासदाराच्या विजयाची जबाबदारी घेतली राष्ट्रवादीच्या बबनदादांनी;दोन लाख मताधिक्क्याची ग्वाही

भाजप खासदाराच्या विजयाची जबाबदारी घेतली राष्ट्रवादीच्या बबनदादांनी;दोन लाख मताधिक्क्याची ग्वाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)