प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने पूरग्रस्तांना २२०० किलो अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
रायगड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने महाड व पोलादपूर परिसरातील पूरग्रस्तांना २२०० किलो अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ, डाळ, गव्हाचे पीठ, गोडेतेल, साखर, चहापावडर, बिस्किटे, चादर, साड्या, कपडे, पाणी बॉटल, सॅनिटरी नॅपकिन, खाऊ, गल्स टॅावेल, साबण, बल्ब, मेडिसीन, भांडे, कोलगेट, ब्लिचिंग पाऊडर, मेणबत्ती, सॅनिटायझर, चणे, मीठ, माचीस बॉक्स, फरसाण, इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण महिलाध्यक्षा दिपिका चिपळुणकर, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, मुंबई संपर्क प्रमुख दिपक भोगल, मुंबई महिलाध्यक्षा अंजली देवा, कोकण युवा संपर्क प्रमुख सागर पवार, तळा तालुका अध्यक्ष सुरेंद्र शेलार, नियती सावंत, हेमंत कांबळे, प्रविण कानडे, निलेश सावंत, जगदिश काशीकर, गणेश जांभळे, अक्षता उमलकर, बदलापूर शहराध्यक्ष नितीन शिंदे, महाड तालुका महिलाध्यक्षा रेश्मा माने, प्रभजी राजपूत, आरती कांबळे, राजेश्री पाटील, कुणाल गोहील, किशोर किर्वे, अमित दिवेकर, रोशन बोरेकर, राजेश घडीवले,अजिंक्य माने आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाड व पोलादपूर परिसरामध्ये महापुरामुळे होत्याचं नव्हतं झालं, अनेकांचे संसार मोडून पडले, कुटुंब रस्त्यावर आलं, अन्नधान्य, कपडे, किराणा, इतर महत्त्वाच्या वस्तू आणि संसार पुरात वाहून गेला. या कुटुंबाचा संसार पुन्हा नव्याने उभा रहावा यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने मदतीचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला प्रतिसाद देत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक पत्रकारांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत केली आणि सर्व जीवनावश्यक वस्तू थेट पूरग्रस्त कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकाऱ्यांनी केले आहे. सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्राचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावं आणि शहरं पूरग्रस्त झाली होती निसर्गाचा प्रचंड कोप आणि मन सुन्न करणाऱ्या घटना घडल्या आहेत म्हणून माणुसकीच्या नात्याने दि.२२ जुलै रोजी झालेल्या महापूरात महाड पोलादपूरवासियांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरात चिखल साचला,अन्नधान्य वाहून गेले तर काही ठिकाणी भिजून खराब झाले. पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन पुन्हा उभे करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने मदतीचा हात देऊन पूरग्रस्तांच्या मनात जगण्याची अन् लढण्याचे बळ दिले आहे.