राज्यातील ढासळत चाललेली कायदा व सुव्यवस्था दुरुस्त करण्यासाठी आणि गुंडागिरी थांबवण्यासाठी फडणवीस यांचा राजीनामा – धनंजय शिंदे यांची मागणी
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई:- महाराष्ट्रात पन्नास खोखे वाल्यांचे बेकायदेशीर “शिंदे – पवार – फडणवीस” सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत. पेपर लीक प्रकरण असो की भ्रष्टाचार आणि गुंडागिरी थांबवण्यासाठी फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
काळ सायंकाळी उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे दिसून येते. फडणवीसांच्या संरक्षणात भाजपचा आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करू शकतो, तर राज्यातील सर्वसामान्य जनता सुरक्षित कशी राहणार? लोक सध्या घाबरले आहेत.
आज आम आदमी पार्टीने राज्यभर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांनी पोसलेल्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी आम आदमी पक्षाच्या खालील मागण्या आहेत.
१) अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने पदावरून हटवावे.
२) कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या गुंडगिरी करणार्या व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
३) भाजप नेते आणि आमदारांची गुंडगिरी थांबवण्यासाठी तातडीने कारवाई करावी.







