संसदरत्न खासदार डाॅ अमोलदादा कोल्हे यांचा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना बैलगाडा मालकांच्या ऒझर येथील बैठकीसाठी निमंत्रणाचा फोन
सुसंस्कृत नेतृत्वाचा पक्ष विरहीत समाजहितासाठी बैलगाडा मालकांच्या प्रश्नासाठी अढळरावांना फोन,कुठलही राजकारण यात होवू नये, शेतकऱ्यांच्या हीतासठी प्रश्नासाठी पक्षीय मतभेद दूर ठेवू बैठकिस सर्वांनी उपस्थित रहावं या साठीचा हा प्रामाणिक प्रयत्न
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून संसदरत्न खा डाॅ अमोलदादा कोल्हे हे सातत्यानं प्रयत्न करताना दिसतात, अधिवेशन काळात पशुसंवर्धन मंत्री पदाचा पदभार स्वीकारलेले नवीन मंत्री यांचेकडे लेखी मागणी करून खा अमोलदादा कोल्हे यांनी भेट घेतली, कालपासून सर्वच राजकिय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेवून निवेदने देण्यासाठी बैलगाडा मालकांनी सुरवात केल्याचे दिसले आहे, परंतू आज सायं 6 वा ऒझर येथे सभागृहात बैलगाडा मालकांची मिटींग आयोजित केली आहे, त्या साठी राजकिय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी यात सहभागी व्हावं म्हणून खासदार डाॅ अमोलजी कोल्हे यांनी स्वत: माजी खा शिवाजीराव आढळराव पाटील यांना फोन करून सभेचे निमंत्रण दिले आहे.
पाहू किती मोठ्या मनाने सर्वच नेते एकत्र येवून या सभेला उपस्थित रहातील. बैलगाडा शर्यती लवकरच सुरू व्हाव्यात यासाठी बैल हा जंगली प्राण्यांच्या यादीतून वगळावा या साठी केंद्र सरकारकडे निवेदने देवून शर्तीचे प्रयत्न खासदार कोल्हे करताना दिसत आहेत.
आज 14 आॅगस्ट रोजी सायं 6 वा ऒझर येथे बैलगाडा मालक व विविध राजकिय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुठल्याही परिस्थितित बैलगाडा चालू झाला पाहिजे हा संसदरत्न खासदार डॉ.अमोलदादा कोल्हे यांचा प्रामाणिक हेतु आहे बैलगाडा चालू होण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन लढणारा छत्रपतींचा पायिक शिरूर लोकसभेचा संघर्ष योध्दा….







