• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!

माणगंगा by माणगंगा
April 22, 2024
in मुंबई
0
प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!

प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!

मुंबई-दादर (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)


आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, सुरेंद्र गावसकर हॉल, दुसरा मजला, नायगांव, दादर (पूर्व) येथे सिने-नाट्य क्षेत्रांतील तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे आणि कुटुंब रंगलंय काव्यात चे सादरकर्ते प्रा.विसुभाऊ बापट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्री गणेश, श्री नटराज आणि शिवप्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने झाली.

आर्यारवी एंटरटेनमेंट चे महेश्वर तेटांबे यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले. लघुपट महोत्सव आयोजीत करणे आणि ते यशस्वी करून दाखवणे हे खुप मोठं जिकरीचे काम असुन महेश्वर तेटांबे आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून करतो आह़े हे विशेष आह़े असे मत विजय पाटकर यांनी मांडले. विसुभाऊ बापट यांनी आपल्या भाषणातून लघुपट महोत्सवात दीर्घकाळ कार्यरत असणाऱ्या महनीय व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून महेश्वर तेटांबे यांनी एक अलौकिकता प्राप्त केली आह़े असे मत मांडले.

त्याचबरोबर प्रसिद्ध ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी आपल्या काव्यमय शैलीत जय जय महाराष्ट्र माझा हे अजरामर गीत आणि उंच माझा झोका हे काव्य गाऊन रसिक प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ, गीता कुडाळकर, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक अनिल सुतार, प्रसिद्ध वादक, अभिनेते डॉ.किशोर खुशाले, जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, समाजसेवक एन.डी.खान, प्रसिद्ध समाजसेवक, अभिनेते खलील शिरगांवकर, फिल्म क्राफ्ट फेडरेशन चे सरचिटणीस दिलीप दळवी, आपलं नवे शहर या दैनिकाचे उपसंपादक राजेंद्र घरत, समाजसेवक संजय सावंत, मदन भाऊ डापसे, अँड सुनिल शिर्के (शिर्के फौंडेशन) आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण, कलाभूषण, रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आले. आयोजक अनंत सुतार यांनी लघुपट स्पर्धेचा निकाल जाहीर केला या निकालात दिपक पवार यांच्या “चोरी” (प्रथम विजेता) रोख रक्कम 25 हजार,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, सुहास कर्णेकर यांच्या “पनाह” (द्वितीय विजेता) रोख रक्कम 15 हजार,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, श्रवण दंडवते यांच्या “पिरॅमिड” (तृतीय विजेता) रोख रक्कम 10 हजार,सन्मानपत्र
आणि सन्मानचिन्ह, दत्तात्रय तिटकारे यांच्या “वणवा” (उत्तेजनार्थ विजेता) रोख रक्कम 5 हजार,सन्मानपत्र
आणि सन्मानचिन्ह आणि आनंद खाडे यांच्या “बाप” (विशेष परीक्षक विजेता) रोख रक्कम 2500/- सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

त्याचबरोबर सिनेसृष्टीत अलौकिक कार्य करणाऱ्या श्री सत्यवान तेटांबे, रमेश साळगांवकर, हरिश्चंद्र भंडारे, आणि अचला पांचाळ यांना प्रसिद्ध ज्येष्ठ कवी यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध निवेदक विलास (बाळा) चौकेकर यांनी आपल्या निखळ वाणीने करून रसिकांची वाहवा मिळवली तर या सोहळ्यासाठी प्रसिद्ध समाजसेवक आणि ग्राफिक डिझायनर मनिष व्हटकर यांनी विशेष मेहनत घेऊन आपलं मोलाचं योगदान दिले.

अभिनेता सुरेश डाळे आणि अभिनेत्री लक्ष्मी मनिष गुप्ता यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. शिरोडकर हायस्कूल 1988 दुपार अधिवेशन च्या मित्रपरिवार यांनी (देवेंद्र पेडणेकर, सुरेश गुरव आणि संदिप चव्हाण) यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली. हा दुसरा लघुपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी रवी मोरे, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे मॅनेजर अनिकेत गावडे, अभिनेत्री प्रणाली निमजे, सुनिल पाटेकर, प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत सुतार, सिनेरामा प्रॉडक्शन चे राम माळी, तेजस माळी, कवी विलास देवळेकर, शशिकांत सावंत, किशोर चौकेकर, दिग्दर्शक गणेश तळेकर, गणेश नर, दिलीप शेडगे, दत्ता खंदारे यांनी सहकार्य केले. आणि जन गण मनं या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Views: 186
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
लग्नसराईची धूमधाम अन् वऱ्हाडी मंडळी घामाघूम

लग्नसराईची धूमधाम अन् वऱ्हाडी मंडळी घामाघूम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)