• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

कोरोनातही झालं नातं अतूट…एफ/दक्षिण विभागातील साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल या मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या राख्या कोरोना योध्यांच्या मनगटी….!

माणगंगा by माणगंगा
August 21, 2021
in मुंबई
0
कोरोनातही झालं नातं अतूट…एफ/दक्षिण विभागातील साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल या मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या राख्या कोरोना योध्यांच्या मनगटी….!

कोरोनातही झालं नातं अतूट…!
एफ/दक्षिण विभागातील साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल या मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या राख्या कोरोना योध्यांच्या मनगटी….!

मुंबई-परेल-प्रतिनिधी


आपला भारत देश हा संस्कृतीप्रधान आणि कृषीप्रधान देश आहे. या देशांत आपण अनेक सण.. उत्सव साजरे करतो. पण गेली दीड ते दोन वर्षे कोरोना सारख्या महामारीला सामोरे जात आपण आपल्या अनेक उत्सव आणि सणापासून वंचित झालो आहोत. त्यातील महत्वाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा. भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्यांची वीण म्हणजे रक्षाबंधन . श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करण्याची प्राचीन परंपरा आपल्या महाराष्ट्रात आहे. जरी कोरोनाच सावट असलं तरी देखील फ / दक्षिण विभागातील साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल, परेल, लालबाग या मनपा शाळेत अनेक सहशालेय शैक्षणिक उपक्रम उत्तमरीत्या राबविले जातात. रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून यंदा या शाळेतील विद्यार्थ्यांनी थर्माकोल किंवा प्लास्टिकचा उपयोग न करता पर्यावरणाबद्दलची संवेदनशिलता जपत पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या.रक्षा बंधनाचे औचित्य साधून या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता कोरोना संकटाला सामोरे जाणाऱ्या आणि आपले संरक्षण करून कर्तव्य पार पडणाऱ्या केईएम इस्पितळाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मिलिंद नाडकर, वरिष्ठ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बांगर तसेच सहाय्यक डॉक्टर्स, वॉर्ड बॉय, भोईवाडा व काळाचौकी पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी यांना राखी बांधून यांच्या बद्दलचा आदर, प्रेम, ऋणानुबंध जपत विद्यार्थ्यांकडून सलामी देण्यात आली.व त्यांच्या सुखी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच सोशल डिस्टन्सिन्गचे भान राखून आणि कायद्याच्या चौकटीत राहून संपन्न झालेल्या या कार्यक्रमास फ / दक्षिण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती वीणा सोनावणे यांनी साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधून त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच या प्रातिनिधिक स्वरूपातील कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक, माननीय श्री सचिन पडवळ, श्री. अनिल कोकीळ, श्री. दत्ता पोंगडे, यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले . हा संपूर्ण कार्यक्रम एज्युको संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मीनल श्रीनिवासन, कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश शर्मा, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल
परेल

Views: 150
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

आगामी काळात प्रशासकीय, पोलीस व महसूल सेवांमध्ये महिलांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक असेल: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)