• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

डेंग्‍यु, मलेरिया या साथीच्‍या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना कराव्‍या – आ. सुधीर मुनगंटीवार

माणगंगा by माणगंगा
August 23, 2021
in मुंबई
0
डेंग्‍यु, मलेरिया या साथीच्‍या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना कराव्‍या – आ. सुधीर मुनगंटीवार

डेंग्‍यु, मलेरिया या साथीच्‍या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना कराव्‍या – आ. सुधीर मुनगंटीवार

आ. मुनगंटीवार यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला उपाययोजनांचा आढावा

अतिरिक्‍त फॉगींग मशीन खरेदीसाठी जिल्‍हाधिका-यांकडे प्रस्‍ताव पाठवावे

जिल्‍हयातील एकही प्राथमिक आरोग्‍य केंद्र रूग्‍णवाहीकेशिवाय राहता कामा नये 

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
 
चंद्रपूर जिल्‍हयात डेंग्‍यु, मलेरिया या साथींच्‍या रोगाचा वाढता प्रादुर्भाव व त्‍यामुळे होणारे मृत्‍यु ही अतिशय चिंतेची बाब आहे. हा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर जिल्‍हा परिषद तसेच सर्व नगरपालिकांच्‍या प्रशासनाने प्रतिबंधात्‍मक उपाययोजना राबवाव्‍या, प्रामुख्‍याने जनजागरण मोहीम प्रतिबंधात्‍मक औषधांची फवारणी आदींवर भर द्यावा. अतिरिक्‍त फॉगींग मशीनची खरेदी करण्‍यासाठी सर्व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांनी खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हाधिका-यांकडे प्रस्‍ताव सादर करावे, आपण स्‍वतः जिल्‍हाधिका-यांशी चर्चा करून यासंदर्भात मान्‍यता मिळवू, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


 
दिनांक २३ ऑगस्‍ट रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी डेंग्‍यु, मलेरिया या साथींच्‍या आजारासंदर्भात उपाययोजना करण्‍याबाबत ऑनलाईन आढावा बैठक घेत लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. या बैठकीला जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, माजी जि.प. अध्‍यक्ष देवराव भोंगळे,  जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती सेठी, महापौर सौ. राखी कंचर्लावार, मनपा आयुक्‍त राजेश मोहीते,  जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. गहलोत,  उपमहापौर राहूल पावडे, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, मुख्‍याधिकारी विजय सरनाईक, सिध्‍दार्थ मेश्राम, मुलच्‍या नगराध्‍यक्षा रत्‍नमाला भोयर, उपनगराध्‍यक्ष नंदू रणदिवे आदींसह जिल्‍हा परिषद सदस्‍य, पंचायत समित्‍यांचे सभापती,  नगरसेवकांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी  डेंग्‍यु, मलेरिया या साथींच्‍या रोगाच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाबाबत आढावा घेतला.

ग्रामीण भागात, मनपा क्षेत्रात तसेच नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रात राबविण्‍याच्‍या उपाययोजनांच्‍या दृष्‍टीने फॉगींगची व्‍यवस्‍था, फवारणीची व्‍यवस्‍था, आवश्‍यकतेनुसार मलेरिया व फायलेरिया वर्करची उपलब्‍धता,  रूग्‍णवाहीकांची उपलब्‍धता, आवश्‍यक औषधांची उपलब्‍धता,  रक्‍त पुरवठा, कर्मचारी अपुरे असल्‍यास रोजंदारी कर्मचा-यांची व्‍यवस्‍था,  ग्राम पंचायतींना स्‍वच्‍छतेसाठी खनिज विकास निधीतुन निधी उपलब्‍ध करता येईल याबाबत विशेष लक्ष्‍य देण्‍याचे आवाहन त्‍यांनी यावेळी केले. लोकप्रतिनिधी म्‍हणून सर्वांनी जागरूकपणे लक्ष्‍य देण्‍याची आवश्‍यकता त्‍यांनी यावेळी प्रतिपादीत केली. जिल्‍हयातील कोणतेही प्राथमिक आरोग्‍य केंद्र रूग्‍णवाहीकेशिवाय राहता कामा नये असे स्‍पष्‍ट निर्देश त्‍यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

यावेळी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातुन करण्‍यात येणा-या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांच्‍यासह तातडीने बैठक घेवून जिल्‍हाधिका-यांकडे तातडीने प्रस्‍ताव सादर करण्‍यात येईल, अशी माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिताली सेठी यांनी दिली. यासंदर्भात आपण जिल्‍हयातील सर्व वैद्यकिय अधिका-यांशी तातडीने चर्चा करून उपाययोजनेची दिशा निश्‍चीत करू असेही श्रीमती सेठी म्‍हणाल्‍या.
 
*चंद्रपूर मनपा क्षेत्रात मनपाने प्रभावी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना राबवाव्‍या*

जिल्‍हयात डेंग्‍युच्‍या एकूण रूग्‍णसंख्‍येपैकी ६९ रूग्‍ण महानगरपालिका क्षेत्रात असल्‍यामुळे यासंदर्भात चंद्रपूर महानगरात गंभीरपणे उपाययोजना करण्‍याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. सध्‍या उपलब्‍ध असलेल्‍या १० फॉगींग मशीन व्‍यतिरिक्‍त ३० फॉगींग मशीन आणखी खरेदी करण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले. महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना हॉस्‍पीटल डेग्‍यु, मलेरीया रूग्‍णांसाठी वापरावे अशी सुचना देखील त्‍यांनी यावेळी केली. महानगरात ३६ नव्‍या फॉगींग मशीन खरेदीचा प्रस्‍ताव जिल्‍हाधिका-यांकडे पाठवावा, शहरात एकाच वेळी सर्वदूर फॉगींग होईल यावर विशेष  भर द्यावा, असेही ते म्‍हणाले. महानगरपालिकेने पुढाकार घेवून रक्‍तदान शिबीर आयोजित करण्‍याच्‍या सुचना देखील त्‍यांनी वेळी केली. चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्‍या माध्‍यमातुन सातही झोनमध्‍ये गृहभेटी देवून जनजागरण करण्‍यात येत असल्‍याची माहिती आयुक्‍त राजेश मोहीते यांनी दिले. तसेच महानगरपालिकेच्‍या माध्‍यमातुन रक्‍तदान शिबीर आयोजित करण्‍यात येईल अशी ग्‍वाही महापौर राखी कंचर्लावार यांनी दिली. यावेळी माजी महापौर सौ. अंजली घोटेकर यांनीही काही उपाययोजना सुचविल्‍या.
 
बल्‍लारपूर नगर परिषद क्षेत्रात सर्व प्रभागांमध्‍ये उत्‍तमरित्‍या फॉगींग होण्‍याच्‍या दृष्‍टीने अतिरिक्‍त फॉगींग मशीन खरेदीचा प्रस्‍ताव जिल्‍हाधिका-यांना सादर करण्‍याचे निर्देश त्‍यांनी मुख्‍याधिका-यांना दिले. मुख्‍याधिकारी सरनाईक यांनी त्‍वरीत सदर प्रस्‍ताव सादर करण्‍यात येईल असे आश्‍वासन दिले. पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रातील प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेबाबत मुख्‍याधिकारी सिध्‍दार्थ मेश्राम यांनी माहिती दिली.
 
जनजागरण मोहीमेवर विशेष भर द्यावा

जनजागरणाच्‍या दृष्‍टीने सर्व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांनी दर्शनी भागामध्‍ये आवाहन करणारे मोठे फलक लावावे, पदाधिका-यांनी जनतेला आवाहन करणारे व्हिडीओ तयार करून ते समाज माध्‍यमांवर प्रसारित करावे व या प्रक्रियेत प्रामुख्‍याने आकाशवाणी या माध्‍यमाचा उपयोग करावा, असे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

Views: 194
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार· ……..राष्ट्रपतींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पुरस्कार वितरण

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार· ........राष्ट्रपतींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पुरस्कार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)