जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाळवाकरांची मने जिंकली !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
वाळवा: सायेब… मी पण फोडू का नारळ?… फोडू नारळ… असा हट्ट एका 6 वर्षाच्या लहानग्या मुलाने धरला. लहानग्या संचितचे निरागस बोल ऐकून जयंत पाटील साहेबांनी लागलीच त्याची इच्छा पूर्ण केली. संचितच्या हातात नारळ दिला आणि सांगितलं फोड नारळ. त्यामुळे संचितने नारळ फोडला आणि त्याची नारळ फोडून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याची इच्छाही पूर्ण झाली.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी ते बावची रस्ता, आष्टा – दुधगाव रस्ता, बागणी – ढवळी – बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगांव दरम्यान दोन लहान पुल, नागाव – भडखंबे – बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांचे शुभारंभ करण्यात आले. वाळवा तालुक्यातील भडखंबे येथे कार्यक्रम सुरू असताना 6 वर्षीय संचित गावडेही त्यावेळी तिथे उपस्थित होता.
आपल्या गावातील मोठी मंडळी नारळ फोडतानाचे चित्र पाहून लहानग्या संचितलाही याचे मोठे कुतूहल वाटले. मोठी हिम्मत करुन करून संचितने नारळ फोडण्याची इच्छा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे व्यक्त केली.
जयंत पाटीलसाहेब यांनी या लहानग्याची इच्छा पूर्ण केली. बर्याचदा आपल्या कृतींच्या माध्यमातून राजकीय नेते लोकांची मने जिंकत असतात. आज राज्याचे पाटीलसाहेब यांनीही आपल्या अशाच एका कृतीच्या माध्यमातून वाळवाकरांची मने जिंकली.







