• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मोदी सरकारमुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके सहन करावे लागत आहे :- आमदार प्रणिती शिंदे

माणगंगा by माणगंगा
September 29, 2021
in मुंबई
0
बलिदान चौकातील हुतात्मा समाजाचे सुशोभीकरणाचे काम माझ्या हातून होत आहे हे मी माझे भाग्य समजते :- आ. प्रणिती शिंदे

मोदी सरकारमुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके सहन करावे लागत आहे :- आमदार प्रणिती शिंदे

शेतकरी देशाचा कणा तो आज मोदी सरकारमुळे मोडून पडला आहे :- सिद्धाराम म्हेत्रे

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सोलापूर शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटी वतीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील व सोलापूर शहर कॉंग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढी व जीवनाश्यक वस्तूंची महागाई विरोधात आणि देशाचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, व लोकशाहीच्या हक्काचे रक्षण करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोदी सरकार विरोधात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दरवाढ कमी करा, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा, MSP चा कायदा करा, महागाई वाढविणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो अश्या जोरजोरात घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, खाद्य तेलाचे दर व महागाई प्रचंड वाढली आहे. यामहागाईत सर्वसामान्य जनता होरपळत असून त्याचे चटके सहन करावे लागत आहे. याविरोधात अनेक वेळा आंदोलन केले तरी जनतेचा आवाज ऐकून घेत नाहीत. याउलट देश अदानी अंबानी यांना विकत आहे, युवक बेरोजगार होत आहे. सर्वसामान्य जनतेचे जगणे असह्य झाले आहे. शेतकरी संकटात आहेत. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचे आवाज दाबला जातो, त्यांना गायब केले जाते. उत्तर प्रदेश मध्ये महंत गायब होत आहेत आत्ता पर्यंत पन्नास जण गडफ झाले आहेत. जातीपातीच्या नावाखाली देशाचे वाटोळे करत आहेत. आमची संस्कृती गोरगरीब तळागाळातील जनतेचे, शेतकऱ्यांचे काम करणे त्यांच्या हितासाठी करत राहणार, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर ची दरवाढ व महागाईमुळे लोक वैतागलेत त्यामुळे दरवाढ व महागाई ताबडतोब कमी करावी. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणारच असे म्हणाले.

यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना अच्छे दिन चे महागाई कमी करण्याचे स्वप्न दाखवून सत्ता हस्तगत केली पण सत्तेवर आल्यानंतर पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरात आणि महागाई प्रचंड वाढविली. महिलांचे सन्मान करतो म्हणणाऱ्या मोदींनी गॅस सिलेंडरचे दर एक हजार रुपयांपर्यंत वाढविली आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील माता भगिनी पुन्हा चुलीकडे वळत आहेत. शेतकरी हा देशाचा कणा असून तो आज मोदी सरकारमुळे पडला आहे. त्याच प्रमाणे मोदी सरकारने शेतकरी विरोधी कृषी कायदे केले ते रद्द झालेच पाहिजे. मन की बात करणारे मोदी सरकार जण की बात कधी करणार, म्हणून मोदी सरकारने महागाई लवकरात लवकर कमी करावे, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे अशी मागणी केली आहे.

यावेळी सोमपा गटनेते चेतन नरोटे, शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, जिल्हा कार्याध्यक्ष अश्फाक बळोरगी, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, जिल्हा महिला अध्यक्ष, नगराध्यक्ष शाहीन शेख नगरसेवक तौफिक हत्तुरे, नरसिंग कोळी, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका फिरदोस पटेल, प्रदेश चिटणीस अलकाताई राठोड, मनिष गडदे, किसन मेकाले गुरुजी, नरसिंह आसादे, अशोक कलशेट्टी, पंडित सातपुते, युवक कॉंग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, अलसंख्यांक जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण, सेवादल जिल्हा अध्यक्ष राजेश पवार, तालुका अध्यक्ष हरीश पाटील, नंदकुमार पवार, गोरख लबडे, जीवनदत्त अरगडे, सतीश पाचकूडवे, सिद्राम सलवदे, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देविदास गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, प्रवक्ते नागनाथ कदम, हसीब नदाफ, अर्जुन पाटील, मल्लेशी बिडवे, तिरुपती परकीपंडला, गणेश साळुंखे, पवन गायकवाड, पशुपती माशाळ, अंबादास गुत्तीकोंडा, NK क्षीरसागर, दत्तू बंदपट्टे, हारून शेख, जेम्स जंगम, कमरूनिस्सा बागवान, वीणाताई देवकते, नंदा कांगरे, अनिल मस्के, विवेक कन्ना, बाबू विटे, अनुपम शहा, उपेंद्र ठाकर, शकील मौलवी, अनिल वाघमारे, गोविंदराव पैके, लक्ष्मण भोसले, सुरेश शिवपूजे, किशोर पवार, सुदर्शन अवताडे, सोहेल पठाण, श्रीधर काटकर, VD गायकवाड, दिनेश म्हेत्रे, नागनाथ कासलोलकर, गोविंद कांबळे, प्रमिला तुपलवंडे, अंजली मंगोडेकर, आप्पासाहेब बगले, सुनील व्हटकर, सुशील बंदपट्टे, यल्लप्पा तुपदोलकर, सोमनाथ व्हटकर, मल्लिनाथ सोलापुरे, शोहेब कडेचुर, सागर शहा, महेशकुमार मस्के, वसंत पाटील, सुधीर लांडे, रामभाऊ वाघमारे, दिलीप जाधव, हणमंत मोरे, भीमराव बंडगर, दत्ता गाडवे, लखन गायकवाड, सूर्यकांत शेरखाने, नूर अहमद नालवार, दिनानाथ शेळके, संजय गायकवाड, सहदेव इप्पलपल्ली, परशुराम सतारेवाले, राजेंद्र शिरकुल, लतीफ शेख, शिव कोरे, सुभाष वाघमारे, बिरा खरात, दाजी कोकाटे, संतोष शिंदे, अरुणा बेंजरपे, सॅमसंन दिनकर, बसंती साळुंखे, शोभा बोबे, शिल्पा चांदणे, मुमताज तांबोळी, भैरवनाथ भोसले, सतीश पाटील, रावसाहेब होनमाणे, राधाकृष्ण पाटील, शिवयोगी बिराजदार, अतिक काझी मशाक वळसांगकर, मल्लिनाथ पाटील, राजू गायकवाड, श्रीकांत दासरी, नागनाथ बंगाळे, शिवाजी साळुंखे, रोहित पाटील, सत्यनारायण वंगा, चंदाताई काळे, संतोषी गुंडे, सुरेखा घाडगे, मीनाक्षी गायकवाड, मोनिका सरकार, इम्तियाज बेलीफ, नरेश महेश्वरम, निलेश व्हटकर, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

Views: 217
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
९ व १० ऑक्टोबरला होणार सीईटी परीक्षा – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत….

९ व १० ऑक्टोबरला होणार सीईटी परीक्षा – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)