सहकारी संस्थेचा कायदा – सदर क्रमांक:-34
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
ग्राहक साक्षरता अभियान
विषय: आमची सोसायटी ही फ्लॅटधारकांची असून, सभासदांना प्लॉट हे भाडेपट्टयाच्या तत्वावर दिले आहेत. आमच्या संस्थेतील एका सभासदाचे नुकतेच निधन झाले. त्यांनी देऊन ठेवलेल्या नोमिनेशन फॉर्म प्रमाणे त्यांच्या पत्नी नॉमिनी आहेत. अशा परिस्थितीत नॉमिनेशनप्रमाणे पत्नीस सभासदत्व देऊन नवीन भाडेपट्टा पत्नीच्या नावे करण्याची आवश्यकता आहे का व सदरच्या भाडेपट्टीयाची नोंदणी करण्याची आवश्यकता आहे का?
उत्तर: सहकारी संस्थेतील सभासद हे त्यांच्यानंतर सोसायटीने सदर प्लॉटबाबत कोणाशी व्यवहार करावा, याबाबत नॉमिनेशन करू शकतात व सदर सभासद मृत पावल्यानंतर सोसायटी महाराष्ट्र सहकारी कायदा व पोटनियमांच्या तरतुदीप्रमाणे योग्य ती चौकशी करून सदर व्यक्तीस सभासदत्व देऊ शकते. सभासदत्व देणे व प्लॉटची मालकी हे दोन भिन्न प्रश्न आहेत. मृत सभासदाच्या नावे एकदा भाडेपट्टा केल्यास त्या जागी आलेल्या सभासदाच्या नावे भाडेपट्टयाची मुदत संपेपर्यंत नवीन भाडेपट्टा करण्याची आवश्यकता नाही. एखाद्या सभासदाने प्लॉट तिऱ्हाईत इसमाच्या नावे तबदील केला तरी सदरच्या प्लीजहोल्ड हक्काचे तब्दील पत्र नोंदणी आवश्यक आहे; परंतु नवीन भाडेपट्टा करून देणे आवश्यक नाही.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, माेबाईल:
7350201000, 8459348218
सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग, AGM, प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.
आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.
श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या दाेन महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल काेहारे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर याेग्य ती कारवाई हाेऊन सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.







