तरुणांसाठी लसीकरणाचे आवाहन !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र.
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आलेल्या सूचनेनुसार,दि. ३ जानेवारी,२०२२ पासून वयोगट १५ ते १८ वर्षांमधील मुलांचे कोविड – १९ विरोधी लसीकरण विनामूल्य सुरु करण्यात येत आहे. याकरिता कोवॅक्सिन लसीचा वापर करण्यात येणार आहे.
इच्छुक कोवीन app द्वारे नोंदणी करू शकतात.
लसीकरण केंद्र :
१. आर/ मध्य व आर/उत्तर विभागासाठी दहिसर जम्बो लसीकरण केंद्र
२. परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या १५ – १८ वयोगटातील मुलांसाठी
विशेष टीप : सन २००७ च्या पूर्वी जन्म झालेले या लसीकरण मोहिमेसाठी पात्र असतील.
पात्र विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा अशी विनंती व आवाहन श्री शिवानंद शेट्टी,
मा. नगरसेवक बोरिवली – पशचिम यांनी केले आहे.







