उरणचे डॉ. महेश पन्हाळे ‘समाजयोध्दा’ पुरस्काराने सन्मानित
अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनकडून ‘दै. वादळवारा’चा सन्मान
उरणचे डॉ. महेश पन्हाळे ‘समाजयोध्दा’ पुरस्काराने सन्मानित
उरण (जि. रायगड) / अनिल पवार (महाराष्ट्र स्टेट ब्युरो चिफ) :- रायगड जिल्ह्यातील धडाकेबाज वृत्तपत्र…अन्याय, अत्याचार विरोधात लढणाऱ्या ‘दै. वादळवारा’ वृत्तपत्राला आज अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनच्या वतीने ‘समाजयोध्दा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दै. वादळवारा वृत्तपत्राचे व्यवस्थापक दिलीप कडू व सहसंपादक प्रविण कोलापट्टे यांनी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केपी न्यूज चैनल एडीटर इन चिफ फिरोज पिंजारी व महाराष्ट्र राज्य महासचिव पत्रकार खलील सुर्वे यांच्या हस्ते सन्मान स्विकारला.
कोरोना काळात जिवाची पर्वा न करता काम करणारे स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महावितरण कर्मचारी, रेशन दुकानदार, पोलीस अधिकारी – कर्मचारी व पत्रकार यांचा त्यांनी समाज व देशासाठी केलेल्या कार्याची दखल घेत अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF), पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली (भारत), खालापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघ, आ. रोहित पवार फाउंडेशन कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने रायगड जिल्ह्याचे डॅशिंग पत्रकार तथा मुख्य संपादक विजय कडू यांच्या नेतृत्वाखाली गरीब, गरजूंसाठी नेहमीच कार्य करणाऱ्या व सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या ‘दै. वादळवारा’ वृत्तपत्रांचा आज सन्मान करण्यात आला.
* उरणचे डॉ. महेश पन्हाळे ‘समाजयोध्दा’ पुरस्काराने सन्मानित :- उरण तालुक्यातील रूग्णांसाठी देवदूत ठरलेल्या डॉ. महेश पन्हाळे यांचाही आज अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनच्या वतीने ‘समाजयोध्दा’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दै. वादळवारा वृत्तपत्राचे व्यवस्थापक दिलीप कडू, सहसंपादक प्रविण कोलापट्टे, अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी, महाराष्ट्र राज्य महासचिव पत्रकार खलील सुर्वे यावेळी उपस्थित होते.







