तेलंगाणा मुख्यमंत्री श्री चन्द्रशेखर राव यांचे मुख्यमंत्री पद काढून घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा.
(रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाची महामहिम राष्ट्रपती कडे मागणी)
मुंबई दि (प्रतिनिधी) तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे मुख्यमंत्री पद काढून घेऊन त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाची गुन्हा नोंदवावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे इमेल द्वारे केली आहे.
इमेल द्वारे केलेल्या निवेदनात डॉ. माकणीकर यांनी म्हटले आहे की, तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री श्री. चंद्रशेखर राव यांनी संविधानिक पदावर राहून असंवेधनिक वक्तवे केले आहे हा गुन्हा असून त्यांचेवर राष्ट्रद्रोहाची कारवाई करण्यात यावी.
संविधानाचा अपमान करणे व संवैधानिक पदावर राहून समविधांनाच्या विरोधात बोलणे म्हणजे राष्ट्रद्रोहच आहे.
आपण आपल्या मार्फतीने बेताल वक्तवे करणाऱ्या मनुवादी मुख्यमंत्री श्री चन्द्रशेखर राव यांचे मुख्यमंत्री पद काढून घेऊन देशद्रोहाचा गुन्हा लावून कायदेशीर कारवायी करण्यात यावी. असेही विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर म्हणाले.
अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) व संविधान प्रेमी तीव्र आंदोलन करतील. यास सर्वस्वी शासन जवाबदार असेल. असा इशाराही डॉ. माकणीकर यांनी केला.






