श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/वाहतुक विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केले आपले मनाेगत !!
आज ही मुंबई वाहतूक विभागात भ्रष्टाचार सुरु आहे !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मा. मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त आदरणीय श्री.दिलीप वळसे पाटील – मा. गृह मंत्री आणि माझ्या पोलीस दलातील मा. अति वरिष्ठ सनदी अधिकारी व मा.वरिष्ठ प्राधिकरण सर्वाना आदरपूर्वक नमस्कार मी सुनील भगवंतराव टोके सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (24004).
महोदय मी ज्या वेळी पोलीस दलातील भ्रष्टाचार करणारांच्या विरोधात पुराव्यानिशी तक्रारी केल्या त्या त्या वेळी किंबहुना आज तागायत आपण सर्वांनी मिळून मला वारंवार कलम 311 लावण्याच्या कारवाईला सामोरं जाण्याची तयारी कर अशा गर्भित धमक्या देऊन माझा मानसिक छळ केला तो आजही चालूच आहे आपल्या सर्व विभागतील मानवी यंत्रणेने माझा छळ, माझा भ्रष्टाचार कारभार करणारांच्या विरोधातील आवाज बंद करण्या करता बेकायदेशीर कृत्ये ही केलीत शेवटी ही भ्रष्टाचार विरोधाची लढाई मी मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल करून लढत आहे जी लढाई खरं तर जनमानसात किंवा मा.न्याय व्यवस्था या माध्यमातून लढण्याची गरजच नव्हती भ्रष्टाचार करणारांवर अंकुश ठेवण्याच्या जबाबदारीची जाणीवच आपल्या सर्वांना नाही.
परंतु आपल्या सर्वांच्या एकमेकास साह्य करू सगळे होऊ भ्रष्टाचारी या कार्याला आपली साथ लाभली आणि मुंबई वाहतूक विभागातील भ्रष्टाचार कारभार करणारांच्या भ्रष्ट कारभाराचे आलेख गगनाला भिडले सन्माननीय उच्च न्यायालयाने दिलेले सर्व निर्देश, आदेश आजही आपण पाळत नाही हे या व्यवस्थेतील मोठं विदारक सत्य आहे इथल्या सन्माननीय न्याय व्यवस्थेला आपण सर्वांनी गृहीत धरले असून खुले आम खोटी प्रतिज्ञापत्र ती लेखी आपण सर्वजण मे न्यायालयात सादर करता हे ही तितकंच विदारक सत्य आहे जे मी स्वतः अनुभवलं आहे.
या मुंबई वाहतुक विभागाचे सण 2013 ते आजतागायत आताचे श्री यशस्वी यादव व आजी माजी मा.पोलीस सह आयुक्त, मा.अपर पोलीस आयुक्त, मा.पोलीस उप आयुक्त, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा.प्रपोनी, या विभागातील कोणत्याही पदांवरील अधिकारी यांना मी वाहतूक विभागातील भ्रष्टाचार करणारां च्या नावासह, पदा सह पुरावे सादर करून तक्रारी केल्या आहेत पण आजही हे सर्वजण कुंभकर्ण झोपेत असल्या सारखे वागत आहेत भ्रष्टाचार कारभारात लिप्त असलेल्या सर्वाना वाचवत आहेत.
आपल्या सर्वांच्या साथी ची साथ लाभली व पोलीस दलात सचिन वाझे गँग, दहशतवादी कारवाया, वसुली, बेकायदेशीर कामे, भ्रष्टाचार, पोलीस दलाचे गुन्हेगारी करण झालं मात्र पोलीस दलाच्या सोनेरी इतिहासाला काळिमा कलंक लावणारी टोळी जन्माला घालणारी ही आपली कार्य शैली समस्त पोलीस दलातील प्रामाणिक इमानदार,भ्रष्ट कारभार नको असलेल्या सनदी अधिकारी, पोलीस अंमलदार यांच्या मानसिक खच्चीकरण करण्यास व नाउमेद करणारी नक्कीच ठरत आहे.
उपरोक्त लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांनी दिनांक 29/06/2021 रोजी दहिसर वाहतूक विभाग मुंबई येथील मा.सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र कारभारी घेगडमल वय वर्ष 56 यांना झोमेटो कंपनीच्या कर्मचारी यांचे कडून लाच रक्कम रुपये 2000/- स्वीकारून ती नष्ट केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या अपयशाचे व भ्रष्टाचार पूरक कारभाराचे खरे जनक कोण आहेत हे सर्वश्रुत आहेच कारण माझ्या मा उच्च न्यायालयातील याचिकेत मी ते सर्व मे न्यायालयात पुराव्यानिशी सादर केलेले आहे त्यामुळे आपण सर्वांनी मिळून त्यावर उपाय योजना तेव्हाच सुरू केली असती तर आज सपोनि श्री घेगडमल चतुर्भुज झाले नसते.
महोदय आपल्या सर्वांचे हे अपयश नक्कीच आहे आजही मा.पोलीस आयुक्त बृहन्मुंबई व मा.पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मुंबई यांच्या सक्त आदेशांचे पालन या व्यवस्थेतील अति वरिष्ठ अधिकारी ते कनिष्ठ करताना दिसत नाहीत?हे मी ठाम पणाने जबाबदारीने बोलत आहे अवैध धंदे आजही तितक्याच जोमाने चालू असून आजही हप्ते खोरी, भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे मग कोणी कोणाला जबाबदार धरायचे ? आपल्या वयक्तिक आर्थिक फायद्या साठी आपणच आपल्या पोलीस दलाची बदनामी केवळ भ्रष्टाचार करूनच करायचा विडाच उचलला असेल तर मात्र अजूनही पोलीस दलात खूप वाझे, विनायक शिंदे आहेत ? उदयास येतील यात शंका घेण्याचे कारणच नाही.
मी स्वतः सतत या विभागातील भ्रष्टाचार प्रकरणांत मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या विभागातील दलातील भ्रष्टाचारावर तो करणारांवर नियंत्रण येण्या करता प्रयत्न करत असून सुद्धा आपण सर्व महोदय अशा भ्रष्टाचार करणारांना वठणीवर आणण्यासाठी योग्य प्रकारे स्वतःची जबाबदारी पार पाडत नसाल आणि मलाच 311 लावण्याच्या धमक्या देणार असाल तर भ्रष्टाचार करणारे अनेक वाझे तयार होणार यात दुमत नाही !! जय हिंद !!!
श्री जगदीश का. काशिकर हे या विचारांशी पुर्ण सहमत आहेत कारण त्यांनीसुध्दा तसा अनुभव घेतला आहे मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटी बाबत !!
श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व ईतर शासकीय यंत्रणेला आपल्या समस्येबाबत अवगत करून महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी तसेच निगडीत शासकिय प्रशासनास दिली आहे व काेमल रहिवाशीची समस्या सुटण्यासाठी त्वरीत हस्तक्षेप व गुन्हेगारयांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत व ऊदया काेमल रहीवाशी साेसायटीमध्ये काही दुघँटना घडल्यास साेसायटीच्या आजी व माजी कमीटी सदस्य तसेच सभासदांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये हे ठरविण्याची वेळ आली आहे व शासकीय यंत्रणा कधी जागी हाेऊन गुन्हेगारांवर कारवाई करून सामान्य गाेर गरिब जनतेला न्याय देणार आहे ? हे सर्व हया देशातील भारतीय नागरिक पहाणार आहेत !!