• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जागतिक जल दिनानिमित्त

माणगंगा by माणगंगा
March 23, 2022
in मुंबई
0
जागतिक जल दिनानिमित्त

जागतिक जल दिनानिमित्त

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: युनोकडून पाणी वाचवण्यासाठी आवाहन करण्यात येते. सर्व देशांची सरकारे देखील त्याबाबत बोलतात. पण पाण्याचा नाश, ज्या यंत्र व रसायनाधारित जीवनपध्दतीपासून ( म्हणजे साधारण सन १७५० ) सुरू झाला व ज्याला ‘विकास’ म्हटले जाते ती जीवनशैली थांबवू असे म्हणत नाहीत.

१ किलो सीमेंट, स्टील वा साखर बनवली तर सुमारे दीड ते दोन हजार लीटर पाणी लागते.
रोज अशा लाखो टन उत्पादनांची निर्मिती होत आहे.

फक्त भारतातच कोळसा जाळून होणार्‍या वीजनिर्मितीसाठी ६० ००० कोटी लीटर पाणी नदी, खाडी सागरातुन घेतले जाते व वाढलेल्या तापमानाचे पाणी परत त्या जलस्त्रोतांत सोडले जाते. यात मत्स्यसृष्टीचा नाश होतो.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात भट्टी थंड ठेवण्यासाठी रोज ५२०० कोटी लीटर पाणी रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या सागरातुन घेतले जाईल व किरणोत्साराने दूषित गरम पाणी परत सागरात सोडले जाईल. याबाबत भारतीय सागर विज्ञान संस्थेचा सन १९८९ चा १००० मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टी प्रकल्प अयोग्य ठरवणारा अभ्यास अहवाल आहे. मग एकूण ९९०० मेगावॅट क्षमतेचे ६ अणुभट्ट्यांचे संकुल सरकार का उभारत आहे ?

मोटारीसारख्या प्रत्येक उत्पादनाच्या निर्मितीसाठी प्रत्येक नगामागे लाखो लीटर पाणी खराब केले जाते.

पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झाले. हा खरा विकास आहे. पाणी वाचवा असे म्हणताना त्याचा विनाश करणाऱ्या मोटार, वीज व सीमेंटलाही कवटाळून रहायचे असे चालणार नाही. ९४% कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन या तीन गोष्टींमुळे होत आहे. हे उत्सर्जन व ‘पाणी आणि हरितद्रव्याचा नाश’ या एकत्र घडणाऱ्या गोष्टी आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु मोटार, वीज व सीमेंट आणि इतर वस्तुनिर्मितीला प्रगती व विकास म्हटले जाते. त्यात प्रतिष्ठा वाटते, सोय दिसते. त्याने जीवनाचा उच्च दर्जा प्राप्त होतो असे मनात भिनले आहे.

तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली आहे आणि पॅरिस करारातील मानवजात वाचवण्याची मर्यादा असलेली पृथ्वीच्या सरासरी तापमानातील २°से ची वाढ आॅगस्ट २०२० मधे झाली आहे, तरी मानसिक भ्रमातुन आधुनिक माणुस बाहेर पडू इच्छित नाही. त्यामुळे जागतिक जल, वन, पर्यावरण, हवामान, वसुंधरा असे वेगवेगळे दिन साजरे करण्यात काही अर्थ नाही.

महाराष्ट्र शासनाने व आधुनिक म्हणवणाऱ्या मानवांनी चालवलेल्या विकासात म्हणजे औद्योगिकरण व शहरीकरणात रोज डोंगरांमागे डोंगर तोडले जात आहेत. यात आपोआपच जंगलांचा व झरे, नद्या, तलाव यांचा नाश होत आहे. धरणे बांधणे, नदी जोडणे, यात पृथ्वीने निर्माण केलेली पाण्याची नैसर्गिक व्यवस्था पूर्ण उध्वस्त होत आहे. नवी मुंबई विमानतळाच्या प्रकल्पात ३ नद्या गाडल्या आहेत. मुंबईच्या मेट्रो-3 भूयारी रेल्वेत मिठी नदीच्या मुखातील माहीमच्या खाडीतील जंगल गाडले. आता वरील डोंगरांमधील पाणलोट क्षेत्रातील जंगल तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यामुळे यांच्या आवाहनांना काही अर्थ उरत नाही. आपण, ताबडतोब मानवकेंद्री विचारपध्दती सोडून पृथ्वीवरील एक सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे. तरच मानवजात योग्य आकलन व निष्कर्षाप्रत येऊन स्वतःची फसवणूक व त्यातुन पृथ्वीवरून होणारे आपले उच्चाटन थांबवेल अशी आशा करू अशा आशावाद अॅड. गिरीश राऊत, निमंत्रक : भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ/ भारतीय पर्यावरण चळवळ
दू. ९८६९ ०२३ १२७ यांनी व्यक्त केला आहे.

Views: 257
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सदर क्रमांक:-004……….महाराष्ट् ओनरशिप फ्लॅटस् कायदा

सदर क्रमांक:-007…..…......महाराष्ट् ओनरशिप फ्लॅटस् कायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)