सदर क्रमांक:-018 महा.ओनरशिप फ्लॅटस् लॉ, ग्राहक साक्षरता अभियान
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
विषय: मी एका विकसकाने एका वर्षापूर्वी सदनिकेचे बुकिंग केले. त्यावेळे सदर विकसकाने सदनिकेच्या विक्रीचा दर हा रु.१३०० प्रति चौरस फूट असा सांगितला व त्याप्रमाणे मी बुकिंगचे पैसे भरले. त्यानंतर माझी बदली झाली व विकसकाने नंतर सदर सदनिकेच्या विक्रीचा दर हा रु.१६००प्रति चौरस फूट झाला आहे असे सांगितले व वाढीव किंमतीची मागणी केली. मी सदरची वाढीव किंमत देऊ केली व बुकिंग केले; परंतु विकसकाने करारनामा रजिस्टर्ड केला नाही व त्यासाठी टाळाटाळ करू लागले. नंतर चौकशी करता प्लॅन मंजूर झालेला नाही, त्यामुळे करारनामा करता येत नाही, असे मला सदर विकसकाने सांगितले. वास्तविक पाहता सदरच्या ठिकाणी इमारतीचे बांधकाम चालू झालेले आहे; परंतु सदरील विकासक हे मला बुकिंग रद्द करून पैसे परत घेऊन जा, कारण अजून नकाशा मंजूर झालेला नाही असे सांगतात, तरी यावर उपाय काय?
उत्तर: याबाबत विकासकाकडून फ्लॅट खरेदीच्या वेळी बुकिंग चे पैसे भरण्याआधी इमारतीचे मान्य नकाशे पाहणे आवश्यक आहे व बुकिंग चे पैसे भरल्यानंतर सदर नकाशाची साक्षांकित प्रत विकासकाकडून सही-शिक्क्यानिशी घेणे आवश्यक आहे. बुकिंगचे पैसे भरताना करारनामा रजिस्टर्ड करणे आवश्यक आहे. आपल्या प्रश्नातून असे दिसून येते, की सदर बुकिंग चे पैसे भरल्यानंतर बराच काळ लोटलेला आहे. आता यासंदर्भात आपण विकसकाला करारनामा करण्याविषयी नोटीस देऊ शकता व नोटिशी नुसार विकसकाने कारवाई न केल्यास आपण त्याविरुद्ध कालमर्यादेत असेल, तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकतात व करारनामा करून देण्याची मागणी न्यायालयात करू शकता.
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे
पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, मोबाईल/व्हाटसअप नंबर:
7350201000, 8459348218
आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.
श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप/पेज त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या तीन/चार महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर तसेच ज्यांनीं गेर व्यवहार करुन आपल्या सदनिका विकत घेतल्या किंवा विकल्या व आपल्या सदनिकेचे नुतनिकरण करताना संरचनेत बदल केला आहे किंवा ईतर गेरव्यवहार केला आहे त्या आजि व माजि गुन्हेगार सभासदांवर याेग्य ती कारवाई करून सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.
अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.
या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.
सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.