मनिषा कडव अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र.
मुंबई – आमदार मा.श्री. प्रकाश सुर्वे (मागाठाणे विधानसभा) यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक महोत्सव – २०२२
अक्षर साहित्य व कला मंच, शिक्षक नेते श्री.एस.ए. शेंडगे मल्टीपर्यज निधी बैंक लि. (मुंबई), चारकोप-गोराई शिक्षक संघ तसेच अखिल भारतीय शिक्षक कल्याण संकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २३ एप्रिल २०२२ शुभम पार्टी हॉल, गणेश चौक, चारकोप, कांदिवली (प.) येथेआयोजित करण्यात आला होता.
यात शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल डी.एस.हायस्कूल, सायनच्या ग्रंथपाल सौ. मनिषा राजन कडव यांना सन २०२२चा पुण्यश्लोक राष्ट्रमाता महाराणी अहिल्याबाई होळकर
कर्तृत्ववान आदर्श महिला पुरस्कार मा. श्री. प्रकाशदादा सुर्वे आमदार / मागाठाणे विधानसभा यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळीप्रमुख मार्गदर्शक श्री. विपुल दोशी समाजसेवक, श्री. दिनेश गायकवाड सर ,श्री. शिवाजी शेंडगे सर , सौ. संध्या विपुल दोशी मा. नगसेविका/ शिक्षण समिती अध्यक्ष , आदींची उपस्थिती होती.







