• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, November 7, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मुंबईत अनेक ठिकाणी छापे, दाऊद इब्राहिमच्या साथीदारांवर NIA ची मोठी कारवाई

माणगंगा by माणगंगा
May 11, 2022
in मुंबई
0
मुंबईत अनेक ठिकाणी छापे, दाऊद इब्राहिमच्या साथीदारांवर NIA ची मोठी कारवाई

मुंबईत अनेक ठिकाणी छापे, दाऊद इब्राहिमच्या साथीदारांवर NIA ची मोठी कारवाई

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई – राष्ट्रीय तपास संस्थेने दहशतवादी दाऊद इब्राहिमचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचे साथीदार आणि पाकिस्तानात बसलेल्या काही हवाला ऑपरेटर्सच्या विरोधात मुंबईत डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. मुंबईतील २० ठिकाणी छापे टाकले आहेत. ही २० ठिकाणे दाऊदचे शार्प शूटर, तस्कर, डी-कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी जोडलेली आहेत. नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार या ठिकाणांचा यात समावेश आहे. छाप्याबाबत माहिती देताना एनआयने सांगितले की, दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या घरांवर अनेक ठिकाणी एनआयएचे छापे सुरू आहेत. अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज पेडलर दाऊदच्या संपर्कात होते आणि तपास संस्थेने फेब्रुवारीपासूनच या संदर्भात कारवाई सुरु केली आहे.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये एनआयएने दहशतवादी कारवाया, संघटित गुन्हेगारी आणि भारतात अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने डी-कंपनीचे शीर्ष नेतृत्व आणि ऑपरेटर यांच्या सहभागाशी संबंधित गुन्हा दाखल केला होता.यूएपीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दहशतवादी दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची येथून अंडरवर्ल्ड नेटवर्क चालवत आहे. त्याच्या सदस्यांनी केलेल्या गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांच्या संपूर्ण प्रकरणावर एनआयएची करडी नजर आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदला २००३ मध्ये यूएनने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याच्यावर २५ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये एनआयएकडे सोपवला होता. एनआयए ही देशातील सर्वात मोठी दहशतवादी तपास संस्था आहे.

Views: 179
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
अयोध्येतील महंताकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना अयोध्या भेटीचे निमंत्रण

अयोध्येतील महंताकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना अयोध्या भेटीचे निमंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)