उदगीर येथील साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 101 वी सार्वजनिक जयंतीचे अध्यक्ष म्हणून जवाहरलाल कांबळे यांची निवड !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
दि.३/८/२०२१ रोजी शासकीय विश्रामग्रह उदगीर येथे उदगीर शहर व तालुक्यातील अण्णाभाऊ साठे प्रेमींची बैठक घेण्यात आली त्या बैठकीचे अध्यक्ष समाजभुषण पुरस्कार प्राप्त गोविंदराव गायकवाड हे होते या बैठकीमध्ये सर्वानुमते जवाहरलाल बन्सीलाल कांबळे यांची 101 वी जंयतीचे अध्यक्ष म्हणुन एकमनाने सर्वानुमते निवड झाली. निवड झाल्याने त्यांचा फेटा व पुष्पहार घालुन साकार करण्यात आला व येणारी 1 ऑगस्टची अण्णाभाऊ साठेंची जयंती हि १८/७/२०२१ अण्णाभाऊ साठेंच्या स्मृती दिनापासून १ ऑगष्ट पर्यंत विविध समाजपयोगी उपक्रमाने सर्वाना सोबत घेऊन साजरी करण्याचा मानस जवाहरलाल कांबळे यानी केला. बैठकीच्या सुरुवातीस माजी जि . प . सदस्य गंगाराम कांबळे गुरुजी यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पन करून बैठक सुरु झाली त्यामध्ये मागचे जंयतीचे अध्यक्ष संग्राम अंधारे यांनी आढावा देवुन बैठक सुरु झाली व खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते जवाहरलाल कांबळे यांची निवड झाली निवड झाल्यानंतर सर्वांनी अण्णाभाऊ साठे पुतळ्यास सर्वप्रथम अभिवादन करून शहरातील डॉ. बाबासाहेब आबेडकर, महात्मा बसवेश्वर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शाहु महाराज पुतळा, वसंतराव नाईक पुतळा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
या बैठकीला जेष्ठ मार्गदर्शक बन्सीलाल कांबळे, युवा नेते योगेश उदगीरकर, माजी नगरसेवक दयानंद अंधारे, संग्राम अंधारे, मदन तुळजापुरे, मारोती चव्हाण, श्याम कांबळे, राजु खादीवाले, सावन टाकसाळे, बालाजी रणदिवे, दयानंद कांबळे, राजु सुर्यवंशी , रामेश्वर शिंदे, बालाजी कांबळे उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दयानंद अंधारे यांनी केले तर आभार संग्राम अंधारे यांनी मानले.