डॉ. ऐश्वर्री यश राठोड यांना इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जळगाव यांनी रियल हिरो कोरोना वॉरियर म्हणून “”डॉक्टर्स डे”” च्या निमित्त शुभेच्छा दिल्या !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
डॉ. ऐश्वर्री यश राठोड एक अस व्यक्तिमत्व जामनेर तालुक्यातला जे सतत दीनदुबळ्यांचा गोरगरिबांना मदत करणारा व्यक्तिमत्व. अशाच व्यक्तिमत्त्वातून हे घडत चाललेले स्वतःची आरोग्य या विभागाला निगडित असून स्वतःचा दवाखाना आहे. स्वतःचा दवाखाना सांभाळून सुद्धा स्वतः सामाजिक सेवेमध्ये रुची असल्यामुळे सामाजिक सेवेमध्ये आतापर्यंत अडीच हजार शिबिरे त्यांनी घेतली.
या शिबिरांमध्ये रक्तदान शिबिर ही सर्वात मोठ्या प्रमाणावर आहे. आज रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांनी त्यांचा सन्मान केला. त्यांना कोरोना वॉरियर म्हणून त्या करत असलेल्या कामाला त्यांची त्यांच्या कारकिर्दीला त्यांनी सन्मान म्हणून हे सन्मानपत्र आज त्यांना देण्यात आलं. डॉ. ऐश्वर्रि यश राठोड या विविध क्षेत्रांमध्ये विविध कार्यरत असतात, कारण की विविध क्षेत्रांमध्ये त्यांना रुची आहे. त्या स्वतः एक डॉक्टर असून आपली डॉक्टरकीचा व्यवसाय सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे आणि मुबलक परिस्थितीमध्ये पेशंटला कमी प्रमाणामध्ये घेऊन आपलं कार्य करत असतात.
त्याच माध्यमातून त्यांनी विविध मोफत आरोग्य शिबिरे सुद्धा जामनेर तालुक्यात घेतली. स्वतःच्या AYR Multipurpose फाउंडेशन मार्फत सुद्धा त्यांनी विविध आरोग्य शिबिरे, वस्त्रदान, अन्नदान, रक्तदान शिबिरे, शैक्षणिक अभियान पुस्तक वाटप इत्यादी अभियान आपल्या तालुक्यामध्ये राबवली त्यांनी आपल्या स्वतःच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून मुंबईला कॅन्सरचे नाव पेशंट न पाठवता, येथे सुद्धा कॅन्सरचे तोंडाचा कॅन्सर चे पेशंट सुधारले आहेत. आणि आजही ती सेवा त्यांची कार्यरत आहेत. आज रेड क्रॉस सोसायटी जळगाव यांनी त्यांचा “कोरोना वॉरियर” म्हणून सन्मान केला.