• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जलवाहिनी जोडकामामुळे मंगळवार, ७ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार, ८ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांसाठी

माणगंगा by माणगंगा
June 4, 2022
in मुंबई
0
जलवाहिनी जोडकामामुळे मंगळवार, ७ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार, ८ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांसाठी

जलवाहिनी जोडकामामुळे मंगळवार, ७ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार, ८ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांसाठी

एफ/दक्षिण विभागांमधील अनेक परिसरांमध्ये तसेच ए, बी, ई विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे एफ/दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता शिवडी बस डेपोसमोर ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड असलेली ६०० मिलीमीटर आणि ४५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीची १५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड देण्याचे काम मंगळवार, दिनांक ७ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार, दिनांक ८ जून २०२२ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे.

या कारणाने, सदर कालावधीत महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण विभागातील रुग्णालय प्रभाग, शिवडी (पूर्व व पश्चिम), परळ गांव, काळेवाडी, नायगांव, शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर तसेच ए, बी, आणि ई विभागातील काही परिसरांमध्ये देखील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर शहर उत्तर व दक्षिण परिसर पाणीपुरवठा विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे.

एफ/दक्षिण विभागः
१) रुग्णालय प्रभागः के. ई. एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, बाई जेरबाई वाडिया रुग्णालय आणि एम. जी. एम. रुग्णालय (२४ तास पाणीपुरवठा) – (दिनांक ७.६.२०२२ रोजी सकाळी १० ते दिनांक ८.६.२०२२ रोजी सकाळी १० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

२) शिवडी (पूर्व) विभागः शिवडी फोर्ट मार्ग, गाडी अड्डा शिवडी कोळी वाडा – (दिनांक ७.६.२०२२ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

३) शिवडी (पश्चिम) विभागः आचार्य दोंदे मार्ग, टि. जे. मार्ग, झकेरिया बंदर मार्ग, शिवडी छेद (क्रॉस) मार्ग – (दिनांक ७.६.२०२२ रोजी सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ७ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

४) गोलंजी हिल पाणीपुरवठा –
अ) परळ गांवः गं. द. आंबेकर मार्ग ५० टेनामेंटपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळ गांव मार्ग, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळींभे मार्ग, एस. पी. कंपाऊंड – (दिनांक ७.६.२०२२ रोजी दुपारी १.४५ ते सायंकाळी ४.४५ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

ब) काळेवाडीः परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी (भाग) साईबाबा मार्ग, मिंट कॉलनी, राम टेकडी
– (दिनांक ७.६.२०२२ रोजी रात्री ८.३० ते रात्री ११.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

क) नायगांवः जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रिंग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेट्ये मार्केट, भोईवाडा गांव, हाफकिन – (दिनांक ८.६.२०२२ रोजी सकाळी ७ ते सकाळी १० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

५) अभ्युदय नगरः अभ्युदय नगर, ठोकरसी जीवराज मार्ग – (दिनांक ७.६.२०२२ रोजी मध्यरात्रीनंतर २.१५ ते सकाळी ६ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

६) शिवडी वडाळा झोनः ज्ञानेश्वर नगर, जेरबाई वाडिया मार्ग – (दिनांक ८.६.२०२२ रोजी सकाळी ६.३० ते सकाळी १० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

७) शहर उत्तर पाणीपुरवठाः दादर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, हिंदमाता – (दिनांक ८.६.२०२२ रोजी सकाळी ७ ते सकाळी १० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)

८) शहर दक्षिण पाणीपुरवठाः लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली – (दिनांक ८.६.२०२२ रोजी पहाटे ४ ते सकाळी ७ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)

९) ई विभागः

अ. जे. जे. रुग्णालय (कमी दाबाने पाणीपुरवठा होईल)

ब. म्हातार पाखाडी – (दिनांक ७.६.२०२२ रोजी सकाळी ६.४५ ते सकाळी ९ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

क. डॉकयार्ड रोड – (दिनांक ७.६.२०२२ रोजी दुपारी १२.३० ते दुपारी ३ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

ड. हाथी बाग हुसेन्नी पटेल मार्ग – (दिनांक ७.६.२०२२ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

इ. रे रोड – (दिनांक ७.६.२०२२ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ८.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

फ. माऊंट रोड (घोडपदेव) – (दिनांक ७.६.२०२२ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

ग. बीपीटी – (दिनांक ७.६.२०२२ रोजी रात्री ९ वाजता- ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

ह. नेसबीट मार्ग, माझगांव – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील)

१०) बी विभागः

अ) संपूर्ण बी विभाग, बाबुला टँक क्षेत्रः
डोंगरी विभाग अ आणि ब – (दिनांक ७.६.२०२२ रोजी रात्री ८.३० ते रात्री १० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

ब) वाडी बंदर– (दिनांक ७.६.२०२२ रोजी सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ५.३० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

क) मध्य रेल्वे – (दिनांक ७.६.२०२२ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ८ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

ड) बीपीटी विभाग – (दिनांक ७.६.२०२२ आणि दिनांक ८.६.२०२२ रोजी सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ५.३० वाजता आणि रात्री ११.३० ते मध्यरात्रीनंतर १ वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

११) ए विभागः बी. पी. टी., नेव्‍हल डॉकयार्ड आणि सेंट जॉर्ज हॉस्पिटल, रामगढ झोपडपट्टी, पी. डिमेलो मार्ग – (दिनांक ७.६.२०२२ रोजी दुपारी १.३० ते सायंकाळी ४ आणि रात्री ९.५० ते मध्यरात्री २.३० वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

संबंधित परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Views: 222
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार अनंतात विलीन..हजारो चाहत्यांनी दिला साश्रुनयनांनी निरोप….व्रतस्थ स्वयंसेवक काळाच्या पड़द्याआड़ : रविंद्र भागवत

डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार अनंतात विलीन..हजारो चाहत्यांनी दिला साश्रुनयनांनी निरोप....व्रतस्थ स्वयंसेवक काळाच्या पड़द्याआड़ : रविंद्र भागवत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)