• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मोदींचं ‘मोदीपण!’

माणगंगा by माणगंगा
September 18, 2022
in मुंबई
0
मोदींचं ‘मोदीपण!’

मोदींचं ‘मोदीपण!’

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.. संसदेचं कामकाज दुपारच्या जेवणासाठी थांबलं होतं. मोदीजी अचानक संसदेच्या कँटीनमधे दाखल झाले..
एका टेबलापाशी खुर्चीवर जाऊन बसले..

‘सर, आपण काय खाणार?’ असा प्रश्न विचारला गेला तेव्हा म्हणाले.. “तुम्ही जे केलं असेल तेच द्या!”
28 रु. ची शाकाहारी थाळी जेवले..

हे सारं भारीच आहे. पण मोदींचं ‘मोदीपण’ दिसतं ते पुढच्या प्रसंगात..

”सर, ‘अभिप्राय वही’त आपण काही लिहावं..!” अशी विनंती झाल्यावर मोदींनी जे लिहिलं ते बापजन्मात अन्य कुणालाच जमणार नाही…

मोदींनी लिहिलं..
‘अन्नदाता सुखी भव!’

आमच्या हिंदू संस्कृतीच्या महावाक्यांपैकी हे एक वचन.
‘ भारतीय सभ्यतेची’ ओळख करुन देणारं.

मोदींनी हे अभिमानानं लिहिलं. 2014 पूर्वी, हिंदू संस्कृतीचा असा उघड गौरव करायला उच्चपदस्थ नेत्यांना भिती वाटायची.. पण मोदींनी हे बदलून टाकलं…

अमेरिकन अध्यक्षांनी आयोजित केलेल्या भोजनप्रसंगीही, ‘माझा नवरात्रीचा उपवास आहे’ हे ठासून सांगावं मोदींनीच. ‘व्हाईट हाऊस’मधे, काचेच्या निमुळत्या चषकांतून ‘फसफसणारे पेय’ न घेता ‘फळांचा रस’ घेणारे फक्त मोदीच!

‘अष्टांगयोग’ ही हिंदू संस्कृतीचीच देणगी आहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींनीच ठसवलं. योग परंपरेच्या उगमाचं खोटं श्रेय लाटण्याचा प्रयत्न अन्य काही शक्ती गेली अनेक वर्षं करत होत्या. मोदींच्या प्रयासामुळे या गोष्टीला ब-यापैकी पायबंद बसला.

ते जिथे जातील तिथे आपला ‘अमीट ठसा’ उमटवतातच. ‘देशासाठी अपार मेहनत घेऊनही यशापासून वंचित राहिलेल्यांना धीर देणं’ ही तर त्यांची खासियत.. मग ते ‘इस्रोचे शास्त्रज्ञ’ असोत वा ‘महिला हॉकी संघ’ असो….प्रत्येकाची जातीनं चौकशी.. ती ही वरवरची नव्हे.. तपशीलात शिरुन!

गेल्या 8 वर्षांमधे मोदींनी अनेक सूक्ष्म पण महत्वाचे बदल घडवून आणले आहेत. मोदींच्या वतीने जनसामान्यांना जी पत्रं येतात त्यावरही ‘मोदीपणाचा’ ठसा दिसून येतो.

एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान निधीतून मदत केल्यास, “ही मदत जनतेच्या पैशातून करत आहोत” हे आवर्जून आणि नम्रतेनं नमूद केलेलं असतं.

‘मुलगा पंतप्रधान असला तरी स्वतःच्या जुन्या सामान्य घरात राहणाऱ्या आईचे’ संस्कार त्यांच्यावर आहेत.. ‘मोदीपण’ हे त्याचंच फलीत असावं.

आम्ही गेली 8 वर्षं, या मोदीपणाच्या प्रेमात आहोत व पुढेही राहू.

Views: 243
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
जीवेत शरद: शतम् मोदीजी!!  नरेंद्र दामोदरदास मोदी!! बस्स नाम हि काफी है!!

जीवेत शरद: शतम् मोदीजी!! नरेंद्र दामोदरदास मोदी!! बस्स नाम हि काफी है!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)