स्टोरीमिरर मराठी विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष पदी आम्रपाली सत्यजित धेंडे यांची निवड !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई : महाराष्ट्र सह संपूर्ण देशात निशुल्क साहित्य सेवा देणारे व्यासपीठ म्हणून स्टोरीमिरर कडे पाहिले जाते, एकूण एक लाख नुसता लेखक वर्ग व करोडो हुन अधिक वाचक वर्ग असणारे स्टोरीमिरर हे देशातील प्रथम व दर्जेदार साहित्य व्यासपीठ ठरले आहे. व देशात त्याचे राज्यानुसार भाषिक विभाग आहेत जे त्या त्या राज्य भाषेवर निशुल्क साहित्य सेवा देण्यात प्रयत्नशील आहेत.
स्टोरीमिरर च्या मराठी विभागातून नुकतीच महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सुरु झाली असून त्यात निस्वार्थी साहित्य सेवेची आवड व साहित्य क्षेत्रासाठी कार्य करण्यासाठीची धडपड असणाऱ्या, आम्रपाली सत्यजित धेंडे, केडगाव स्टेशन तालुका. दौंड, जिल्हा पुणे यांची पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
त्यांनि साहित्य सेवेसाठी दिलेले वेळोवेळी योगदान व साहित्य सेवेसाठीची तळमळ पाहून स्टोरीमिरर मराठी विभाग प्रमुख, रोशन मस्के सर यांच्या अध्यक्षते खाली स्टोरी सह प्रमुख अंगद दराडे यांच्या शिफारसीनुसार करण्यात आली आहे. या निवडी बद्दल आम्रपाली सत्यजित धेंडे यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे व स्टोरीमिरर मराठी विभाग प्रमुख रोशन मस्के सर, अंगद दराडे, यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच साहित्य क्षेत्रातील राजश्री वाणी, स्टोरीमिरर स्त्री शक्ती विजेत्या भाग्यश्री बागड, शालू कृपाले इत्यादी साहित्यिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.