R.N music चॅनल काव्य वाचन स्पर्धा पुरस्कार ठाणे च्या शुभांगी गदेगावकर पुरस्काराने सन्मानित !
ठाणे ;
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व शासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये बंद ठेवण्यात आली. अशा वेळी लोकांना घरी बसून कंटाळा आला. याचा बराच फायदा ऑनलाईन पद्धतीला झाला.
आज पर्यंत प्रत्यक्षात किंवा सभा बोलवून अथवा एखाद्या कार्यक्रमांचे आयोजन करून, पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम घेऊन काव्य वाचन, गायन, नृत्य, वक्तृत्व अशा स्पर्धांचे आयोजन केले जात असे. पण कोरोनाने मात्र लोकांना ऑनलाइन स्पर्धा घेण्याची संधी दिली. याचा फायदा असा झाला की लोकांनी घरीच बसून व्हिडिओ बनवले. आयोजकांना पाठवले.
बऱ्याच आयोजकांनी स्पर्धा घेतल्या. पण पुरस्कार देताना मात्र बरेच आयोजक टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे. काही आयोजक सध्या कोरोना आहे, तेव्हा कसे काय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करावे, पुरस्कार कसा द्यावा अशी सोयिस्कर उत्तरे देऊन पुरस्कार देत नाहीत.काही पुरस्कारच जाहीर करत नाहीत.काहींनी तर अगदी सीमाच पार केली.ते केवळ यू ट्यूबला व्हिडिओ टाकून सबस्क्राईबर वाढवतात व निकाल जाहीर करुन गप्प होतात. खूपच तगादा लावल्यास कोरोना प्रादुर्भाव संपल्यावर कार्यक्रम घेऊ अशी बतावणी करतात.कोरोना काळात स्पर्धा घेतात पण, पुरस्काराची वेळ आल्यावर कच खातात.
R N म्युझिक चॅनलचे आयोजक श्री. राम पाटील यांनी काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन केले. अशा बिकट परिस्थितीत कोरोनाच्या काळात स्पर्धा घेऊन त्यांनी निकाल जाहीर केला.कार्यक्रम प्रत्यक्ष करता न आल्याने त्यांनी प्रथम क्रमांक
डाॅ. सौ. शुभांगी गणेश गादेगावकर रोख रक्कम ३३३३रू., द्वितीय क्रमांक श्री. बच्चू भाऊ गावंडे रोख रक्कम २२२२रू., तृतीय क्रमांक कु. योगिता चिंचोलीकर रोख रक्कम ११११रू. जाहीर केले व गुगल पे द्वारा दिले
.तसेच इतरही स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी आणखी चार स्पर्धक उत्तेजनार्थ म्हणून निवडले.त्यांची नावे अनुक्रमे कु. दिपाली माटोरकर, सौ. अनुसया उदमले, श्री.नारायण गडाख, श्री. कृष्णकांत राईलकर
या सातही स्पर्धकांना त्यांनी कुरिअर ने प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह पाठवले.तरी R N music चॅनलच्या या कौतुकास्पद कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.