• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

ओटीपी द्वारे रचलेला नवीन सापळा
सायबरच्या या फ्रॉड पासून सावध व्हा…. ऍड. चैतन्य भंडारी यांचा सावधानतेचा ईशारा ….

माणगंगा by माणगंगा
November 19, 2022
in मुंबई
0
ओटीपी द्वारे रचलेला नवीन सापळासायबरच्या या फ्रॉड पासून सावध व्हा…. ऍड. चैतन्य भंडारी यांचा सावधानतेचा ईशारा ….

ओटीपी द्वारे रचलेला नवीन सापळा
सायबरच्या या फ्रॉड पासून सावध व्हा…. ऍड. चैतन्य भंडारी यांचा सावधानतेचा ईशारा ….

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुबंई: बँकिंग व्यवहार संदर्भात आपल्याला आलेला ओटीपी, आपला पिन नम्बर, आपला अकाउंट नंबर, कुणालाही अपरिचित लोकांना देऊ नका. हे बँकांनी सर्वाना सांगून सावध केलं आहे. लोकही त्याबाबत सावध झालेत. त्यामुळे आता फसण्याचे ते प्रमाण बरेच कमी झाले आहे. हि समाधानाची बाब आहे.

मात्र हीच गोष्ट असे फ्रॉड करणाऱ्या हॅकर मंडळींनी देखील ओळखून आता नवीन पद्धत आणली आहे. हा नवीन सापळा आहे. तो नीट समजून घ्या आणि सावध व्हा !

हा सापळा नेमका कसा आहे ?

तुमच्या दाराची बेल वाजते. तुम्ही दार उघडता. समोर एक स्मार्ट व बोलघेवडा डिलिव्हरी बॉय उभा असतो. तो म्हणतो, “तुमचं एक पार्सल आहे. कॅश ऑन डिलेव्हरी आहे. तर हे पार्सल घ्या आणि पैसे द्या”

तुम्ही तर कसलीच ऑर्डर केलेली नसते. तरी घरच्यांनी परस्पर केली असेल म्हणून घरच्यांना विचारता. घरचेही म्हणतात की त्यांनी काहीच ऑर्डर केली नाही. मग तुम्ही त्या डिलिव्हरी बॉय ला सांगता, “आम्ही ऑर्डर केली नाहीय. परत घेऊन जा”
त्यावर तो बॉय म्हणतो, “ओके, हरकत नाही. फक्त तुम्हाला ऑनलाईन कॅन्सलेशन करावं लागेल. त्यासाठी आमचा एक मेसेज येईल व त्यात ओटीपी असेल. तो सांगा मला. मी मग ऑर्डर कॅन्सल करतो. पण लवकर करा कारण हा ओटीपी दहा सेकंदच ऍक्टिव्ह राहणार आहे” (आणि एक लक्षात घ्या, हे डिलिव्हरी बॉय जे असतात न ते हॅकर मंडळींकडून चांगल्या प्रकारे ट्रेनिंग घेऊन आलेले असतात. संवाद कौशल्य इतकं खात्रीपूर्वक असत की तुम्ही जणू हिप्नोटाईज होता) आणि तुमच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज येतो आणि शेवटी ओटीपी येतो.

तुम्ही नीट ऑब्जर्व करत असाल तर आठवून पहा अधिकृत ट्रॅन्जेक्शन करताना सुद्धा टेक्स्ट मेसेज विथ ओटीपी येतो तेव्हा टेक्स्ट मेसेज सेकंदभरच दिसतो आणि हाईड (शॉर्ट) होऊन फक्त ओटीपी तेव्हडा ठळक दिसतो.

तुम्ही जर त्या ओटीपी ला क्लिक केलं तरच तो टेक्स्ट मेसेज पुन्हा ओपन होऊन नीट वाचता येतो. पण ९९% लोक ते करत नाहीत. त्यात परत त्या डिलिव्हरी बॉय ची घाई सुरु झालेली असते. त्यामुळे तुम्ही लगेच त्याला ओटीपी देऊन मोकळे होता. कारण तुम्हाला तुम्ही ऑर्डर न केलेलं पार्सल परत कधी एकदा जाईल याची काळजी लागलेली असते. त्या नादात तुम्ही तो टेक्स्ट मेसेज नीट वाचत नाही. आणि तिथंच फसता. आणि मग समोरचा बॉय तुमचा ओटीपी त्याच्या मोबाईलवर घेतो आणि सांगतो की, “ऑर्डर कॅन्सल झाली आहे. थँक्स.” असं म्हणत तो निघून जातो अन तुम्ही रिलॅक्स होता.
मात्र थोड्याच वेळात तुमच्या बँकेतर्फे डेबीटेड चा मेसेज येतो आणि तुमच्या लक्षात येत की तुमचं अकाउंट पूर्ण रिकामं झालं आहे. तुमच्यावर आभाळच कोसळते.

हाच तो नवीन सापळा आहे.

आता यात काहीजणांना काही शंका पडू शकतात की माझ्या बँकेचे डिटेल्स हॅकर ला कसे माहित ? कारण त्याशिवाय तर माझे खाते हॅकर रिकामं करू शकत नाही न ?

तर

१) मागे कधीतरी केवायसी च्या नावाखाली “मी बँकेतून केवायसी डिपार्टमेंट कडून बोलतोय” असं म्हणत आलेला कॉल व त्यातून त्याला तुम्ही दिलेली माहिती हि त्या हॅकर च्या हाती पडते. कारण बँक कधीच असा कॉल वर माहिती मागवत नसते.

२) एटीएम मध्ये पैसे काढायला गेल्यावर पैसे काढून झाल्यावर “रिसीट हवी की नको” हे ऑप्शन येते, तिथं “हवी आहे ” म्हटलं तर रिसीट येते. अनेकजण ती रिसीट फक्त वाचतात आणि तिथेच टाकून देतात. वाईन शॉप मधेही कार्ड पेमेंट केले तर तो रिसीट देतो ती रिसीट अनेकजण तिथेच टाकून देतात. हॅकर ची लोक अशा ठिकाणच्या जवळच लक्ष ठेवून असतात. ते ती रिसीट ताब्यात घेऊन त्यातून तुमचं खाते नंबर प्लस शिल्लक किती आहे हे सगळं माहित करून घेतात.

अशाच इतर काही मार्गाने तुमच्या बँकेचे डिटेल्स हॅकर लोक मिळवून तुम्हाला जाळ्यात ओढतात. आणि तुमचं खातं रिकामं करतात.
यावर उपाय काय ?

तर अशा कोणत्याही न मागवलेल्या पार्सल च्या वेळी त्या बॉय ने काहीही सांगू दे. त्याच्या हिप्नोटाईज प्रकारच्या बोलण्यात अडकू नका. त्याला सरळ सांगा. “मी काही ओटीपी देणार नाही निघून जा नाहीतर मी पोलिसांना बोलावेन”

तुम्ही हे बिनधास्त बोलू शकता कारण तुम्ही काही केलंच नाही तर घाबरता कशाला ?

मग पहा…. तो क्षणभरहि थांबणार नाही. पळून जाईल !

काळजी घ्या व हि माहिती तुमच्या घरच्यांनाही सांगून ठेवा, मित्रमंडळींना सांगा. जागे राहा. सावध व्हा !

Views: 185
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
केसरी टूर्सला ग्राहक न्यायालयाचा दणका—–सहली साठी भरलेले 55 हजार शुल्क व्याज व नुकसान भरपाई सहित देण्याचे आदेश

केसरी टूर्सला ग्राहक न्यायालयाचा दणका-----सहली साठी भरलेले 55 हजार शुल्क व्याज व नुकसान भरपाई सहित देण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)