श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केली आपली व्यथा/तक्रार !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पोलीस दलातील वरिष्ठ सनदी अधिकारी व त्यांच्या भ्रष्टाचार कारभाराचे सोबती असणाऱ्या ना वेगळा न्याय दिला जातो का ?
याचे योग्य उत्तर होय नक्कीच आहे हे अंत्यत जबाबदारीने व पुराव्यांच्या आधारे मी सुनील भगवंतराव टोके सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (24004) मुख्य नियंत्रण कक्ष मुंबई बोलत आहे.
महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे. मा.गृह मंत्री श्री दिलीप वळसे पाटील, मा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री हेमंत नगराळे जी आपल्या सर्वांना नमस्कार मी पाठवत असलेला माझा लेखी जबाब हा चौकशी अधिकारी मा.पोलीस उप आयुक्त बंदर परिमंडळ मुंबई. श्री. गणेश शिंदे यांनी दिनांक 27/10/2020 रोजी त्यांच्या कार्यालयात टंक लिखित स्वरूपात घेतलेला असून त्यावर त्या मान्यवरांच्या दिनाकीत स्वाक्षरी सह माझी ही स्वाक्षरी आहे.
सर्व मान्यवर महोदय हे सर्व या माध्यमातून आपल्याला पाठवीत आहे याचा राग द्वेष आपणांस नक्कीच असणार आहे कारण शिस्तीच्या खात्यात हे योग्य नाही असा फतवा काढून आपण सर्वजण आपले अपयश झाकण्यासाठी काहीही करू शकता याचे अनेक अनुभव जे बेकायदेशीर आहेत कायद्याला अभिप्रेत नाहीत ते मी पोलीस दलातील भ्रष्टाचार उघड करताना आजही अनुभवत आहे अर्थात मी केलेली रास्त तक्रार ही दिनांक 24/02/2020 रोजी व्ही पी रोड पोलीस ठाणे हद्दीतील स्वरूप डान्सबार मधील गंभीर प्रकरणांची व सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या व मे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे, न्याय निवड्याचा अवमान/अपमान करणारा आहेच पण आपले ही आदेश पायदळी तुडवून ते धुडकावून लावून अवैध धंदे वाले यांना साथ देणारे आहे.
सदर गंभीर प्रकरणाची लेखी तक्रार मी केली त्यावेळी जे मा.स.पो. आयुक्त गिरगांव विभाग मुंबई श्री नागेश संभाजी जाधव तसेच तत्कालीन वपोनी श्री गुलाबराव मोरे हे पोलीस दलात कार्यरत होते. कोरोना संक्रमण महामारीचा हवाला देऊन हे दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी सेवानिवृत्त होईपर्यंत या गंभीर प्रकरणाची चौकशी जाणीव पूर्वक आपण
सर्वांनी टाळून आपल्या अपयशी प्रशासकीय, राजकारणाची चुणूक दाखवून दिलेली आहेच आणि याच करता मी माझे मत व्यक्त करताना ज्या या लेखाची सुरवात केली ती सुरवात नक्कीच योग्य प्रकारे केलेली आहे.
मान्यवर माझ्या जबाबातले ज्या मुद्यांशी मतांशी मी सहमत आहे त्यावर आजही ठाम आहे कारण याच मुंबई पोलीस दलात परमवीर सिग व त्यांचे हस्तक वाझे, काझी, माने, शिंदे, शर्मा यांच्या भ्रष्टाचार प्रकरणांची नांदी आणि डान्सबार चालक/मालक यांच्या अभय रुपी इमारतीच्या पाया भरणी ला सुरवात होऊन त्यावर कळस चढवण्यात अगदी महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजदरबारात त्याची सांगता झाली हे ही थोडके नव्हे मी केलेल्या गंभीर प्रकरणांत मुंबई पोलीस दलातील आजी माजी गँग ऑफ वझेपुर जनतेसमोर येऊ नये या करता आपण नक्कीच सक्रिय सहभाग घेत आहात या प्रकरणात जर पोलीस अंमलदार सहभागी असते तर त्यांना घरचा रस्ता कधीच दाखवला असता आपण सर्वांनी मात्र इथं सनदी अधिकारी ते त्यांच्या मर्जीतील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सहकारातून हे भ्रष्टाचाराच कुरण वाढत होत वाढत ही आहे त्यामुळे पोलीस दलाची बदनामी होत नाही वाटत.
मात्र मी भ्रष्टाचार करणारांचे वस्त्रहरण करतो,तक्रारी करतो म्हणून मी पोलीस दलाची प्रतिमा मलिन करतो असे माझ्यावर आरोप करणारे आपण सर्वजण मात्र माझ्या भ्रमणध्वनी यंत्रणेचा cdr काढणे मी कोणाशी बोलतो हे ऐकणे अशी बेकायदेशीर काम करत असतात मात्र मी पोलीस दलातील मनमानी कारभार करणारे,भ्रष्टाचार करणाऱ्या च्या बाबत आपल्या सर्वांना लेखी पुराव्यां सह तक्रार करतो मात्र त्यावर योग्य कारवाई/कार्यवाही वर्ष वर्षभर होत नाही इथं विलंब अधिनियम लागू होत नाही वाटत म्हणूनच शेवटी या माध्यमातून हे आपल्या सर्वांना पाठवत आहे.
मला यात कोणाची वयक्तिक बदनामी किंवा शासन/पोलीस दलाची बदनामी करण्याचा हेतू नाही फक्त भ्रष्टाचार करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना वाचवण्यासाठी जी आपली कार्य शैली आहे ती चुकीची आहे असो हे ही प्रकरण मा न्यायव्यवस्थेच्या दारी स्वखर्चाने नेणारच आहे कारण मी सत्य बोलतो म्हणून आपल्या सर्वांचा अहंकार दुखावतो जय हिंद !!
श्री जगदीश का. काशिकर हे या विचारांशी पुर्ण सहमत आहेत कारण त्यांनीसुध्दा तसा अनुभव घेतला आहे मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटी बाबत !!
श्री जगदीश काशीकर यांनी काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व मंबई महानगरपालिकेला समस्येबाबत अवगत करून महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी तसेच निगडीत शासकिय प्रशासनास दिली आहे व काेमल रहिवाशीची समस्या सुटण्यासाठी त्वरीत हस्तक्षेप व गुन्हेगारयांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे या देशातील सर्व जागरूक भारतीय जनतेने/नागरिकांनी कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत व ऊदया काेमल रहीवाशी साेसायटीमध्ये काही दुघँटना घडल्यास साेसायटीच्या आजी व माजी कमीटी सदस्य तसेच सभासदांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये हे ठरविण्याची वेळ आली आहे !!