जोगेश्वरी शिक्षण संस्था खरसुंडी च्या वतीने मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान
आटपाडी प्रतिनिधी
जोगेश्वरी शिक्षण संस्था खरसुंडी चे चेअरमन व ज्येष्ठ पत्रकार किशोर पुजारी यांच्या वतीने आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकारी व सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार किशोर पुजारी म्हणाले पत्रकारांनी एक संघ राहून वेगवेगळ्या विषयावर लिखाण केले पाहिजे. जेणेकरून आपल्या तालुक्याचे उत्पन्नाचे साधन म्हणजे शेती आहे. शेतीविषयी वेगवेगळे विषय लिहून समाज जागृत केला पाहिजे. तसेच तालुक्यामध्ये टेंभू योजनेचे पाणी आले आहे. त्याची नियोजन पद्धती बद्दल लिहावे. तसेच शोध पत्रकारिता यावर लिखाण करावे . शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पन्न कसे निघेल या पद्धतीने लिखाण करावे व समाज जागृत करावा असे यावेळी म्हणाले.
यावेळी अध्यक्ष मुजू तांबोळी,उपाध्यक्ष सदाशिव पुकळे, कार्याध्यक्ष लक्ष्मण सरगर, जेस्ट पत्रकार सतीश भिंगे,हमीद शेख, नागेश गायकवाड,प्रशांत भंडारे,गणेश जाधव,दीपक प्रक्षाळे,कांतीलाल कारळे,सुरेश मोकाशी,अमोल काटे,बिपीन देशपांडे,अंकुश मुढे,,लतीफ मुलाणी, राजू शेख,विक्रम भिसे,लक्ष्मण खटके,नंदकुमार विभुते,मनोज कांबळे,प्रवीण भिंगे, अशोक पवार उपस्थित होते







