आटपाडी चे: उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी निलंबित; पोलिस ठाण्यात पैसे घेतल्याच्या व्हिडीओवरून कारवाई
आटपाडीचे उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी निलंबित;
पोलिस ठाण्यात पैसे घेतल्याच्या व्हिडीओ रेकॉर्डिंग वरून कारवाई केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी आटपाडी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी यांना निलंबित केले.
करगणी येथील सागर जगदाळे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला होता . गोसावी यांनी पैसे घेतल्याचा व्हिडीओ जगदाळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे दिला होता. त्या आधारे गोसावी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.







