मोलगी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाचे महिला व बालविकास मंत्री – श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या सोबत बैठक ,
मंत्रालयाच्या दालनात संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती. मायाताई परमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली दालनात पार पडली.
या बैठकीत मानधन वाढ, नवीन मोबाईल, पोषण ट्रॅकर, मिनी अंगणवाडी चे नियमितीकरण आणि अशा इतर एकंदर 20 पेक्षा जास्त महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मानधन वाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये मान्यतेसाठी आलेला असून वित्त विभागाच्या मंजुरीनंतर लवकरच मानधन वाढ जाहीर करण्यात येईल, असे माननीय मंत्री महोदयांनी चर्चेत सांगितले.
कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईल पुरवण्याच्या प्रस्तावाला बाबत लवकरच कर्मचाऱ्यांना नवीन व उत्तम दर्जाचे मोबाईल पुरवण्यात येतील,
पोषण ट्रॅकर ची भाषा ही अंशतः मराठी झालेली आहे. मात्र संघटनेच्या मागणीनुसार ती 100% मराठी व्हावी यासंदर्भात बोलताना… याआधीच केंद्र सरकारकडे त्याबाबत पत्र पाठवले आहे, आणि लवकरच पोषण ट्रॅकर ॲप ची भाषा ही 100% मराठीत होईल .असे सांगण्यात आले.
मिनी अंगणवाडी सेविकांना इतर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रमाणे रिक्त पदी थेट नेमणूक मिळण्यासाठी शासन विचाराधीन आहे.
सेवा समाप्तीनंतर असंख्य कर्मचाऱ्यांना अद्याप सेवा समितीच्या लाभाच्या रकमा मिळालेल्या नाहीत. त्या रकमेच्या बाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच याबाबत LIC मार्फत कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची रक्कम अदा केली जाईल.
ज्या केंद्रांवर रिक्त पदे आहेत अशा केंद्रांवर अतिरिक्त काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मेहनताना देण्याबाबत शासन विचाराधीन आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या गणवेशासाठीच्या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत लवकरच विचार केला जाईल.अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सादिल खर्चाच्या रकमेमध्ये वाढ करण्यावर विचार केला जाईल.
मुख्य सेविका पदासाठीच्या भरती प्रक्रियेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वयाची सूट देण्याबाबतच्या प्रस्तावावर विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सूट देण्याबाबत शासन स्तरावर विचारपूर्वक निर्णय घेण्यात येईल. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा मोफत मिळावी यासाठी आरोग्य खात्याकडे पत्रव्यवहार करण्यात येईल.अमृतआहार योजनेतील सध्या मिळणाऱ्या प्रति लाभार्थी दरामध्ये वाढ करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. यावेळी अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि लवकरच मानधन वाढ जाहीर करण्यात येईल असे शिस्टमंडळामार्फत सांगण्यात आले आहे.यामध्ये अंगणवाडी संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर, सुशीला कोळी, युवराज पी. बैसाणे, रामकृष्ण बी. पाटील, दत्ता जगताप, सुधीर परमेश्वर,आदींची यावेळी उपस्थिती होती.







