कानिफनाथ गड परिसरात 24 तासानंतर ही बत्तीगुल : नागरिकांची गैरसोय
पुणे प्रतिनिधी ( अॅड . दत्ताञय फडतरे )
पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोपगाव येथील कानिफनाथ गड परिसरात 24 तासानंतर ही बत्तीगुलच असल्याने नागरिकांमधुन नाराजी होत व्यक्त आहे . एक दिवस उलटुनही प्रशासनाने काहीही दखल न घेतल्याने मोबाईल चार्जिंग , टी .व्ही . मनोरंजनाची साधने बंद झाली आहेत . जेष्ठ नागरिक , शालेय , विद्यार्थी , तसेच आॅनलाईन काम असणार्या व्यक्तींना मोठ्या ञासाला तोंड द्यावे लागत आहे . घरात पाणी भरणे , फ्रीज वापरता येण शक्य नसल्याने महिलावर्गाची तारांबळ उडत आहे . ज्या नागरिकांकडे चार्जिंगची वाहन आहेत . त्यांना , चार्जिग अभावी दुचाकी वापरता येणे शक्य नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली .
महावितरण विभागातील वरिष्ठ प्रशासनाने दखल घेवून यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे . विनाअडथळा वीज सेवा देणे महावितरणचे कर्तव्य असताना चोवीस तासानंतरही वीजपुरवठा पुर्ववत न झाल्याने स्थानिक रहिवाश्यांकडुन संताप व्यक्त होत आहे . वीजेअभावी दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण झाल्याने महावितरण विभाग दखल तरी केव्हा घेणार असा सवाल या भागातील ग्रामस्थांमधुन विचारला जात आहे .