गोसावी समाजाच्या समाधिंना संरक्षण द्या. उपमुख्यमंत्र्याकडे मागणी.
नागपूर दिनांक 18.
दशनाम गोसावी समाजात मृत्यूनंतर समाधी संस्कार करण्यात येतात अनेक गाव खेड्यांमध्ये संत महांतांच्या, नागा साधू गोसावी यांच्या समाध्या आहेत, परंतु काही समाजकंटकांकडून त्या समाधीची नासधुस करण्यात येऊन धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे .
भंडारज, तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील समाधिंची अशाच प्रकारे काही समाजकंटकांनी तोडफोड करून नासधुस केली व धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न केला. अशा समाजकंटकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे या संन्याशी साधू संत महंतांच्या नागा गोसावींच्या समधिंना शासनाने संरक्षण देण्यात यावे .
अशा प्रकारची मागणी दशनाम गोसावी समाज संस्थेतर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन करण्यात आली .या मागणीचा सकारात्मक विचार करून संरक्षण पुरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन शिष्टमंडळाला देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिश्ट मंडळाचे नेतृत्व दशनाम गोसावी समाजाचे नेते श्री योगेश बन यांनी केले. यावेळी हिंदू धर्मगुरू आखाडा नागपूर शहराचे अध्यक्ष श्री गणेश पुरी,दिलीप भारती,मंगेश पुरी,विजय गिरी, इत्यादी उपस्थित होते.
आपला विश्वासू
योगेश बन.