पत्नीवर संशय घेऊन पतीकडून मारहाण
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी ता. आटपाडी येथील बालटेमळा येथील अनिता हनुमंत मडीवाळ माहेर त्रिकोळी ता.उमरगा जि. उस्मानबाद येथील असून अनिताचा पती हनुमंत हा वेळोवेळी तुझे सोमा राक्षे यांच्याबरोबर अनैतिक संबंध आहेत असे म्हणून शारीरिक व मानसिक जाच हाट छळ करीत होता.
तसेच तू नांदायचे असेल तर सोमा च्या घरी जाऊन राहा असे म्हणून तू इथे राहायचे नाही. असा सतत त्रास देऊन लाकडी दांडक्याने उजव्या हातावर मारले असून त्यामध्ये उजव्या हाताची करंगळी चे बोटाला जखम झाली आहे. याबाबत पोलिसांमध्ये गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस हे.कॉ. आवळे करीत आहेत.







