पडळकरवाडीच्या पोलीस पाटील पदी अमोल पडळकर यांची निवड
आटपाडी प्रतिनिधी
पडळकरवाडी ता. आटपाडी येथील पोलीस पाटील पदी अमोल पडळकर यांची निवड झाली आहे. ही निवड स्पर्धा परीक्षेमधून झाली आहे.
यापूर्वी अमोल पडळकर यांनी पाणी फाउंडेशन मध्ये भरपूर प्रमाणात श्रमदान केले आहे. तसेच रोजगार सेवक म्हणून ते सध्या काम पाहत आहेत. अनेक निराधार महिला पुरुषांना पेन्शन सुरू करण्यासाठी मदत केली आहे. तसेच कोरोनाच्या काळामध्ये अनेक कोरोना रुग्णांना मदत केली आहे.
अमोल यांना समाजकार्याची आवड असल्याने सामाजिक कार्यामध्ये सतत हिरवेने भाग घेत असतात.
नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांची पोलीस पाटील पदी निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.







