कुरुंदवाडीच्या पोलीस पाटील पदी काजल चवरे यांची निवड
आटपाडी प्रतिनिधी
कुरुंदवाडी ता. आटपाडी येथील काजल सुहास चवरे यांची स्पर्धा परीक्षेमधून पोलीस पाटील पदी निवड झाली आहे. यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.
यापूर्वी काजल यांचे सासरे जगन्नाथ चवरे हे कुरुंदवाडी गावचे उपसरपंच होते. त्यानंतर काजल चवरे यांचे पती सुहास चवरे यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिले आहे. काजल चवरे यांचे पती सुहास चवरे व सासरे जगन्नाथ चवरे यांना समाजकार्याची आवड आहे.







