राष्ट्रीय ओबीसी महासंघाची(रजि.)अॅड. डॉ. पी.बी. कुंभार व श्री. सुभाष वासुदेव मुळे यांचे वर महाराष्टाची जब्बाबदरी!!!
पुणे :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाची (रजि.) ची मुख्य कार्यलयात दि. २९ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ६.०० वा ४९, निवारा हौसिंग सोसायटी, धनकवडी येथे महत्वाची मिटिंग झाली. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव अॅड. डॉ.पोपट बी. कुंभार यांची निवड करून त्यांना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष कर्मवीर योगाचार्य डॉ. प्रल्हाद वडगांवकर यांचे शुभहस्ते आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठात कार्यरत असलेले सुभाष वासुदेव मुळे यांची महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी निवड झालेची नियुक्ती पत्र राष्ट्रीय सरचिटणीस सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते सन्मानपूर्वक देण्यात आले.
यावेळी डॉ. वडगांवकर म्हणाले की महाराष्ट्रात मंडल आयोग लागू होण्यासाठी नामदार छगन भुजबळ यांचे सोबत आपल्या महासंघाने 1980 पासुन मोठे काम केलेले आहे.पुढे ही संस्था अखिल भारतीय कार्यक्षेत्र काम करण्यासाठी 2001 साली अधिकृत पणे धर्मदाय आयुक्त पुणे यांचे कडे नोंद करून आज तागायत कार्य चालू आहे. मागील 3 वर्षात राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियानांतर्गत अनेक कार्यक्रम घेऊन जनप्रबोधन करीत ओबीसी जागृती साठी पुस्तकं व काही महापुरुषांचे पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत.फुले शाहु आंबेडकर चळवळ म्हणजे कोणते विचार ,कार्य व कार्य कसे करावे यावर देखील प्रबोनात्मक पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे.
याप्रसंगी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की, ओबीसी चे अनेक प्रश्न व अन्यायकारक गोष्टी देशभर घडू लागले आहेत. खरे तर भारतीय जनगणना करताना सर्व जाती धर्माची नोंद करून ओबीसीची त्या सोबत वेगळी नोंद केली पाहिजे. सर्वाना ज्या त्या प्रमाणात भारतीय घटनेप्रमाणे अधिकार, हक्क व सवलती देऊन देशाचे त्याप्रमाणे स्वतंत्र बजेट जाहीर केले पाहिजे.”पुढे ढोक असेही म्हणाले की नॉनक्रिमलयेरची मर्यादा 15 लाखापर्यंत तातडीने वाढवून कोणीही प्रवेश व शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी”*.
तसेच ज्या त्या वर्षीच शिष्यवृत्ती वाटप झाली पाहिजे याची दक्षता सरकारने घ्यावी म्हंटले. तर डॉ.कुंभार म्हणाले की आमची निवड करून महाराष्ट्रात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करीत देशात २०२१ ची भारतीय जनगणना करताना ओबीसी जर स्वतंत्र नोंद करणार नसतील तर आम्ही मोठा लढा उभा करून संपूर्ण जनगणेवर बहिष्कार टाकून ओबीसी च्या प्रत्येक घरावर ओबीसी म्हणून नोंद करणार असेल तरच कुटुंबातील माहिती मिळेल अन्यथा दरवाजा बंद ही भूमिका व इतर अनेक प्रश्नावर जन जागृतीचे काम करून गावागावात आपल्या महासंघाचे कार्य पोहचवून कार्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुदाम धाडगे व आभार सुभाष मुळे यांनी मानले.







