• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

पोरानं बत्तीशी पार केली, पण लग्नासाठी पोरगी मिळेना…मुलींच्या अपेक्षा वाढल्या मुलगा नोकरीवालाच हवा….

माणगंगा by माणगंगा
April 12, 2023
in सांगली
0
पोरानं बत्तीशी पार केली, पण लग्नासाठी पोरगी मिळेना…मुलींच्या अपेक्षा वाढल्या मुलगा नोकरीवालाच हवा….

पोरानं बत्तीशी पार केली, पण लग्नासाठी पोरगी मिळेना…
मुलींच्या अपेक्षा वाढल्या मुलगा नोकरीवालाच हवा….


आटपाडी प्रतिनिधी


ग्रामीण भागातील सर्वच समाजातील अनेक पोरांनी 32 पार केली असून लग्नासाठी पोरगी काय मिळेना अशी अवस्था अनेक तरुणांची झाली आहे सर्रास मुलींच्या अपेक्षा वाढल्याने त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मुलींना स्थळ भेटत नाही अनेक तरुणांच्याकडे नोकरी नाही. प्रत्येक मुलीला सर्विस वाला नवरा हवा आहे घरी गाडी बंगला आसायला हवा अशा अपेक्षा मुलींच्या आहेत.
जुन्या पद्धतीच्या ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेला झुगारुन मुली आधुनिकतेची आस धरताना आपल्याला पहायला मिळत आहेत. शेतकरी असणारे शेतकरीच शेतीला दुय्यम समजू लागल्यामुळे शेतकरी मुलीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.


जो तरुण पुण्यामुंबई सारख्या शहरात नोकरीला आहे .अशा तरुणांना आपली मुलगी द्यावी असं लोकांना वाटू लागले आहे.सध्याची लग्नसंस्था पैशाभोवती फिरणारी मागील काही दिवसांत तरुणांना मुलगी मिळण्याचे वास्तव भयानक झाल्यामुळे काही लोकांनी मुलींच्या कुटुंबियांना पैसे देण्याची प्रथा सुरू केली आहे. ही प्रथा आजही खेड्यापाड्यात सर्रासपणे सुरू आहे. ही बाब तरुणांसाठी जास्तच त्रासदायक ठरत आहे.


त्याचबरोबर लग्न करण्यासाठी मुलगा आर्थिकदृष्ट्या किती श्रीमंत आहे हे साधारणपणे बघितलं जात आहे. त्यावरुन स्थळ ठरवण्यात येतात. आर्थिक स्थैर्य न बघता लग्न करणारे कमी जोडपे सध्याच्या घडीला आपल्याला पहायला मिळत आहे.


पुरुषप्रधान संस्कृतीसध्या देशातील बहुतांश ठिकाणी आपल्याला पुरुषप्रधान संस्कृती पहायला मिळते. कुटुंबावर पुरुषांचा ताबा असल्याने महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा येत असताना आपल्याला पहायला मिळत आहे.
ह्या गोष्टींमुळे सरळसरळ स्त्रीपुरुष भेदभाव होऊ लागल्याने मुली त्यांचे निर्णय स्वता: घेऊ शकत नाहीत. म्हणून लग्नासाठी मुलगा निवडण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मुलींना नव्हते.


पण सध्या पाश्चिमात्य संस्कृतीचा मोठा प्रभाव भारतीयांवर पडल्याने बऱ्याच भागातील चित्र वेगळे आहे. आजकालच्या तरुणी लग्न झाल्यानंतरही जुन्या प्रथा झुगारून स्वता:च्या पायावर उभा राहण्याचं स्वप्न बघत आहेत.
ग्रामीण भागातील पुरुषप्रधान संस्कृतीसुद्धा लग्नासाठी काहीश्या प्रमाणात कारणीभूत ठरलेली आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.


शेती व्यवसाय तोट्याचा असल्याचा समज ग्रामीण भागातील शेतकरी शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत नसल्यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न निघत नाही. म्हणून शेती हा कायमच तोट्यातील व्यवसाय आहे असा गैरसमज शेतकऱ्यांचा झाला आहे म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना मुलगी देण्यास लोकं टाळतात. पण शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने बघण्याची वृत्ती नसल्यामुळे आज तरुणांचे मानसिक खच्चीकरण होण्यास कारणीभूत ठरतेय.

बेरोजगारी, व्यवसाय, शाश्वती आणि गरजामागील काही दशकापासून जसे रोजगार वाढले आहेत तसेच बेरोजगारांची संख्याही वाढली आहे. उच्चशिक्षित तरुणही आज बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात.


MPSC आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे काही तरुण 7-8 वर्षे अभ्यासात घालून हाती काहीच न लागल्याने गावी परत जाऊन शेती करू लागले आहेत. ग्रामीण भागात एखादा छोटामोठा शेतीपूरक व्यवसाय जरी असला तरीही त्यातून गरजा पूर्ण होतील का? हा व्यवसाय चालण्याची शाश्वती आहे का? असे बरेच प्रश्न असतात म्हणून चांगले पैसे कमावणारे तरुणांना सुद्धा आज मुली द्यायला लवकर कुणी धजवत नाहीत.


….लग्नाचं वाढलेलं वय धोकादायक की परिणामकारक …


मागच्या दोन दशकापासून तरुणांच्या लग्नाचे सरासरी वय वाढलेले आपल्याला दिसेल. यासाठी आपल्याला शारिरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या विचार करावा लागेल. आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळाल्यावर काही तरुण लग्न करण्यास पसंती देतात. तर काही भविष्याचा विचार करुन लवकर लग्न करण्यास पसंती देतात. परंतु आर्थिकदृष्ट्या स्थैर्य न मिळवत लग्नाचा विचार करणारे तरुणसुद्धा आजकाल पहायला मिळतात.

उशीरा लग्न केलेल्यांना भविष्यात शारिरीक अडचणींचा सामना करावा लागू शकतो असे डॉक्टरांचे मत आहे. तसेच उशीरा लग्न केल्याने प्रजनन क्षमता कमी होते अशी माहीतीही डॉक्टरांनी दिली आहे. म्हणून लग्नाचं वाढतं वय काही प्रमाणात आपल्या भविष्यावर परिणाम करु शकतं. त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या करिअरसाठी जो वेळ लागतो त्या कालावधीत पालकांच्या वयाने साठी पार केलेली असते. यामुळे आर्थिक स्थैर्य आणि शारिरिक अशा दोन्ही दृष्टीकोनातून विचार करुन लग्र करण्याला आजकाल तरुणांनी प्राधान्य द्यायला हवं.


मुलांचे लग्नाचे वाढत चाललेले सरासरी वय आणि मानसिक, कौटुंबिक परिणामदोन दशकांपूर्वी ग्रामीण भागात किंवा शहरी भागात मुलांना लग्नासाठी सहज मुली मिळत होत्या. परंतु वरील काही कारणांमुळे आता शिक्षित तरुणांना लग्नासाठी भटकावे लागत आहे. काही तरुण लग्न होण्यासाठी तात्पुरतं पुण्यासारख्या शहरात येऊन काम करतात. या सगळ्या गोंधळात मुलांचे वय वाढत जाते. पूर्वी 21-25 व्या वर्षी मुलांचे लग्न व्हायचे परंतु आता हेच लग्नाचे वय 30 ते 35 च्या घरात जाऊन ठेपले आहे.


लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून तरुणांचे मानसिक खच्चीकरण होऊ लागले आहेत. परिणामी मुलांचे कुटुंबीय सुद्धा आज मानसिक गर्तेत अडकलेले आहेत.


राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालाच्या नोव्हेंबर 2021 मधील सर्वेक्षणानुसार भारतातील लिंग गुणोत्तरानुसार 1000 पुरुषांमागे 1020 महिला आहेत. मागील काही दशकाच्या प्रमाणाच्या तुलनेत देशात महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची दिसून आली आहे.


दीड ते दोन दशकात ग्रामीण व्यवस्थेत झालेले बदलसाधारण दोन दशकांपूर्वी म्हणजे 2000 सालापासून भारतात तंत्रज्ञानाचे युग वेगाने उदयास आले. ही क्रांती जशी वेग घेऊ लागली तसेच खेडेपाडे बदलू लागले. हळूहळू तंत्रज्ञान गावागावांत पोहोचल्यामुळे लोकं जगाशी जोडले जाऊ लागले, आणि त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. परिणामतः वैचारिक पातळीवरही बदल झाल्याचे दिसून येऊ लागले. तंत्रज्ञानाबरोबर पाश्चिमात्य संस्कृती भारतात आल्याने त्याचे अनुकरण भारतीय करू लागले आणि वैचारिक दूरदृष्टी ग्रामीण भागात हळूहळू पसरायला लागली .या बदलामुळे लोकांच्या अपेक्षा साहजिकच वाढत गेल्या. शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर लोकं अधिक गांभीर्याने विचार करू लागले. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबं सुद्धा शिक्षणावर भर देऊ लागले आहे.


दरम्यानच्या काळात लिंग गुणोत्तर प्रमाण हे पुरुषांपेक्षा महिला कमी असे असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलींचे कुटुंबीय मुलींसाठी अधिक चांगले स्थळ शोधू लागले. म्हणून बेरोजगार आणि शेतकरी मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण गोष्ट बनली.लग्नाची बदललेली व्याख्या आणि मुलींच्या कुटुंबीयांच्या अपेक्षा वाढलेल्या.


याआधी भारतात महिलांचे प्रमाण हजार पुरुषामागे कमी असल्यामुळे साहजिकच मुलींच्या कुटुंबियांना आपल्या मुलींसाठी चांगले स्थळ मिळेल अशा अपेक्षा आहेत. जुन्या चालीरीतीप्रमाणे लग्नाचे प्रकार सध्या कमी झालेले आहेत.


प्रतिक्रिया
प्रत्येक वस्तूंच्या किंमती वाढल्या, डिझेल पेट्रोलचे दर वाढले, शेतीसाठी लागणारे रासायनिक खते औषधे यांचे दर वाढले . ट्रॅक्टरचे दर वाढले. त्याच पटीमध्ये शेतीमालाचे दर वाढले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याच्या दारी सदैव घरीच राहिली.
शेतीत केलेली मशागत, रासायनिक खते औषध फवारणी, केल्यानंतर त्याचा खर्चही शेतीतील माल विकून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाला मुलगी द्यायला कोणी धजवत नाही.


गणेश जुगदर — अविवाहित शेतकरी

Views: 401
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
गावागावात आली स्वस्तात मरणाची स्ट्रिंग’लहान मुले, प्रौढही गेले आहारी :

गावागावात आली स्वस्तात मरणाची स्ट्रिंग'लहान मुले, प्रौढही गेले आहारी :

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)