मौजे हिवरे येथे दारूबंदी साठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली.
माणगंगा न्यूज नेटवर्क
या ग्रामसभेचे प्रास्ताविक रा. स. प. चे जत तालुका अध्यक्ष बंडू डोंबाळे यांनी केले.यानिमित्ताने जत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश रामाध्ये यांनी महिलांचे शिक्षण, दारूबंदी मुळे होणारे फायदे व यामुळे होणारा गावचा विकास यावर समाजप्रबोधन केले.
या ग्रामसभेमध्ये एकमुखाने दारूबंदीचा ठराव करण्यात आला. तसेच दारूबंदी समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये गीतांजली शिंदे, सुनिता मलमे, माया कचरे, शोभा चौगुले, छाया सोलनकर, मीता चौगुले, बंडू डोंबाळे, बलभीम पाटील, शहाजी भोसले, बाळासाहेब शिंदे, सचिन शिंदे, अशोक चौगुले यांची निवड करण्यात आली.
या ग्राम सभेमध्ये सरपंच, सर्व सदस्य,गावातील विविध पदाधिकारी ग्रामसेवक, पोलीस निरीक्षक राजेश रामाध्ये, पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड, पोलीस अंमलदार सचिन हाके, मनसे तालुका अध्यक्ष बलभीम पाटील, रासप तालुका अध्यक्ष बंडू डोंबाळे तसेच सर्व ग्रामस्थ व गावातील सर्व महिला उपस्थित होत्या.







